Dainik Maval News : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या माध्यमातून दरवर्षी एका गडापासून दुसऱ्या गडापर्यंत धारातीर्थ गडकोट मोहीमेचे आयोजन केले जाते. यावर्षीचीही मावळ तालुक्यात असून किल्ले श्री लोहगड ते किल्ले श्री भिवगड (मार्गे श्री एकवीरा देवी व श्री राजमाची गड) अशी ही मोहीम होणार आहे.
दरवर्षी देशभरातून हजारो धारकरी या मोहिमेसाठी येत असतात. यंदा २३ वर्षानंतर मावळ तालुक्यात मोहीम असल्यामुळे मावळवासियांसाठी ही भाग्याची गोष्ट ठरणार आहे. संभाजी भिडे गुरुजी यांचे मावळात मोठ्या उत्साहात स्वागत केले जाणार आहे. यावर्षी ही मोहीम दिनांक 23 जानेवारी 2026 ते 26 जानेवारी 2026 या दरम्यान लोहगड व भिवगड दरम्यानच्या भागांमध्ये पार पडणार आहे.
दि. २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता भगव्या झेंड्याचे व तुळजाभवानीच्या आरतीने मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. दिनांक २३ तारखेला मोहिमेचा मुक्काम हा भाजे येथे असणार आहे आणि त्यानंतर २४ तारखेला मोहीम पुढे मार्गस्थ होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी या मोहिमेचे आयोजन केले जाते.
गडकिल्ले व इतिहास यांचे जतन व संवर्धन होण्यासाठी त्याच बरोबर नवीन पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी या मोहिमांचे आयोजन दरवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून केले जाते निर्व्यसनी व प्रखर देशभक्त तरुण पिढी निर्माण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ‘…त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलंच नाही’ ; मावळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने – सामने
– निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर ; जागोजागी होतेय वाहनांची तपासणी
– राष्ट्रवादीकडे युतीसाठी कुठलाही प्रस्ताव नाही अन् मावळात राष्ट्रवादीसोबत युती नाही ! – बाळा भेगडे यांच्याकडून युतीला फुलस्टॉप
– इंदुरी – वराळे जिल्हा परिषद गटात राजकीय भूकंप ; प्रशांत भागवत, मेघा भागवत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम
