Dainik Maval News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून आणि पॉस्को इंडिया यांच्या सीएसआर फंडातून शासकीय उपजिल्हा रुग्णालय कान्हे फाटा, मावळ येथे तीन डायलिसिस मशीन आणि आरओ प्लांट बसविण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी आचारसंहितेपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले होते.
मशीन भेट देताना क्लबचे अध्यक्ष कमलेश कार्ले, उपाध्यक्ष श्रीशैल मेन्थे, सचिव प्रमोद दाभाडे, यादव खळदे, महेश महाजन, उद्धव चितळे, विलास जाधव, विष्णू बच्चे, धनंजय मथुरे, पॉस्को इंडियाचे डोवॉन हॉंग,अमोल बुदखळे, संतोष देशमुख, प्रदीप देशमुख, नेहा वाघचौरे, सीएसआर कॉर्डिनेटर रवी कुलकर्णी उपस्थित होते.
ह्या मशीनमुळे मावळ तालुक्यातील डायलिसिस च्या रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयातच मोफत आणि चांगले उपचार घेता येणार आहे. तर आरओ प्लांटमुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आणि नातेवाईकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारूगोळा जवळ बाळगण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी
– शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी पदी सोमनाथ ताकवले यांची नियुक्ती, एस.डी. वरक यांच्याकडून स्वीकारला कार्यभार
– रेल्वेत हरवलेली बॅग पुन्हा हाती आली आणि तीचे दुःख हरवले ! रेल्वे पोलीस अनिता रायबोले यांना सॅल्यूट