भारत सरकारतर्फे दिनांक 25 ते 31 जुलै दरम्यान ‘डिजिटल इंडिया’ सप्ताह साजरा करण्यात येणार असून सर्व नागरिकांना ई-गव्हर्नन्स सेवांबद्दल माहिती देण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचा अधिक वापर व्हावा यासाठी हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी पूर्व नोंदणी केल्यास नागरिकांना विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेता येईल. ( Digital India Week Will Start From 25th July Citizens Will Get Information About Central Schemes Know More Details )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भारताचे तंत्रज्ञान क्षेत्रातील काम जगासमोर आणणे, टेक स्टार्टअप साठी सहयोग व व्यवसायाच्या नवीन संधी शोधणे, नवीन पिढीला प्रेरणा देणे, नागरिकांना ई-गव्हर्नन्स सेवांची माहिती देणे आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे यासाठी या सप्ताहाचे आयोजन होत आहे. याअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यात सहभागी होण्यासाठी http://www.nic.in/diw2023-reg ह्या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
माहिती तंत्रज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांनाही या क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान विषयांवरील व्याख्याने आणि चर्चा यामध्ये सहभागी होण्याची विनामूल्य संधी याद्वारे उपलब्ध होईल. अधिकाधिक नागरिकांनी नोंदणी करून ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– म्हाडा आणि सिडकोत घरासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारकडून उत्पन्नाच्या मर्यादेत मोठी वाढ
– मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा ‘वाळुंजकर’ यांची निवड
– बालविवाह प्रकरणी पतीला अटक, मावळमधील धक्कादायक घटना! अल्पवयीन पत्नी 5 महिन्यांची गरोदर झाल्यानंतर प्रकार उघड