हल्ली किरकोळ व्यवहार करतानासुद्धा डिजिटल पेमेंटचा वापर केला जातो. मात्र मावळ तालुक्यातील पवनमावळ विभागातील तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तुंग गावात मध, लिंबू-सरबत, ताक आदी विक्रीचा किरकोळ व्यवसाय करणाऱ्या महिला वर्गाला या डिजीटल व्यवहाराची माहिती नसल्याने त्यांना अनेकदा नुकसान सहन करावे लागत होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यामुळे, हॅन्ड इन हॅन्ड इंडिया आणि यूएसजीआय कंपनी (USGI company) यांनी संयुक्तरित्या तुंग गावात डिजीटल साक्षरता प्रशिक्षण शिबिर राबवले. ग्राम उद्धार प्रकल्पाअंतर्गत तुंग गावातील महिलांना डिजीटल साक्षरतेचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर महिलांना डिजिटल पेमेंटसाठी फोन पे स्कॅनर सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली, यामुळे येथील महिलांच्या व्यवसाय वाढीसाठी मदत होणार आहे. ( Digital Literacy Training Camp At Tung Village Maval Taluka By Hand In Hand NGO Talegaon Dabhade )
तुंग गावातील सर्व व्यवसायिक महिला यावेळी उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी USGI Company चे आणि हँन्ड इन हँन्ड इंडीया संस्थेचे आभार मानले. यावेळी मा सरपंच शांताराम पाठारे, सौरभ जाधव, हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेतील सारिका शिंदे, निकीता मोरे, पंढरीनाथ बालगुडे आदीजण उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! मावळ विधानसभेच्या मनसे पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर, थेट राज ठाकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान, पाहा संपूर्ण यादी
– देवाभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार शेळकेंच्या हस्ते विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशन
– तुंग गावात हॅण्ड इन हॅण्ड आणि यू.एस.जी.आय संस्थांकडून ग्रीन व्हिलेज कार्यक्रम । PHOTO