वैकुंठवासी मृदंगमणी हरी भक्त पारायण दत्तोबा महाराज शेटे यांचे 16 वे पुण्यस्मरण आणि गुरुपौर्णिमा निमित्त सोमवारी (दिनांक 28 ऑगस्ट 2023) विशेष पुरस्कार प्रदान सोहळा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नंदकुमार शेटे महाराज यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा खास सत्कार करण्यात आला, तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमांनी सोहळ्याची सांगता झाली. ( dignitaries from various fields were honored on the occasion of death anniversary of dattoba maharaj shete )
खालील मान्यवरांचा करण्यात आला सन्मान –
सोमवारी झालेल्या कार्यक्रमात; वारकरी भूषण पुरस्कार गुरुवर्य बाळकृष्ण बाबाजी वचकल, वारकरी भूषण भाऊसाहेब टाकळकर, गुणवंत गुरवर्य पुरस्कार राजेंद्र दोंडीराम लासुरकर (मुख्याध्यापक), कमलेश राक्षे ( सामाजिक क्षेत्र – तथा अध्यक्ष महान राष्ट्र डेव्हलपमेंट फाउंडेशन पुणे), संगीता भालघरे अध्यापिका खांडी शाळा, विलासशेठ भेगडे जेष्ठ पत्रकार लोकमत, संजय अडसूळे पत्रकार मावळ वार्ता, पै. सागर बाबर (महाराष्ट्र चॅम्पियन), समृद्धी भोसले राष्ट्रीय युवा खेळाडू, तृप्ती निंबळे आंतरराष्ट्रीय खेळाडू, श्रुती मालपाटे पीएसआय, पै. प्रसाद जाधव (खेड केसरी) यांचे विशेष सत्कार करण्यात आले. तसेच रात्री, महाराष्ट्रातील नामवंत संगीत भजन सम्राट पंडित बाळासाहेब वायकर यांच्या संगीत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, नेते, लोकप्रतिनिधी, पंचक्रोशीतील नागरिक, भाविक इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण शेलार यांनी केले. तर, आभार प्रदर्शन रामदास तथा बाळा शेटे (माजी उपसरपंच) यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि निमंत्रक मयुर नंदकुमार शेटे, मनोज नंदकुमार शेटे, यशवंत शेटे आणि समस्त शेटे बंधू हे होते.
धार्मिक आणि समाजकार्यात अग्रेसर शेटे कुटुंबीय –
नंदकुमार शेटे महाराज हे महाराष्ट्र राज्य कलाभुषण पुरस्कार प्राप्त आहेत. आशाताई नंदकुमार शेटे या उत्कृष्ट गायिका आहेत. हे दांपत्य आणि शेटे कुटुंबीय मागील 15 वर्षांपासून धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच समाजप्रबोधनाचे कार्य निःस्वार्थ भावनेने करत आहेत. काही दिवसांपूर्वी भंडारा डोंगर इथे उभारण्यात येत असलेल्या मंदिरासाठी त्यांच्याकडून 25000 रुपये देणगी देण्यात आली होती. ( dignitaries from various fields were honored on the occasion of death anniversary of dattoba maharaj shete )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटनेकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडे ‘या’ मागण्यांचे निवेदन सादर
– ई-पीक पाहणी म्हणजे काय? शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर पीक पाहणीच्या नोंदी करण्याचे आवाहन, वाचा अधिक
– “बिबट्या वैरी नाही तर शेजारी…”