Dainik Maval News : मुंबईतील पेठे फाउंडेशनचे संचालक, शिवभक्त दिलीप माधव पेठे यांनी जांबवली येथील श्री कोंडेश्वर महादेवाच्या शिवपिंडीवर चांदीचा पत्रा अर्पण केला आहे. दिलीप पेठे यांनी जवळपास 15 लाख रूपये किमतीचा चांदीचा पत्रा भगवान महादेवाच्या पिंडीसाठी अर्पण केला असल्याने शिवभक्तांना कोंडेश्वर महादेवाच्या शिवलिंगाचे नव्या स्वरूपातील दर्शन यामुळे घडणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नाणे मावळ विभागातील श्रीक्षेत्र जांबवली येथे श्री कोंडेश्वर महादेवाचे प्राचीन आणि शिवकालीम शिवमंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जेव्हा कोकणात उतरत असत तेव्हा ते येथील शिवमंदिरात अवश्य दर्शनासाठी थांबत, असे येथील स्थानिक सांगतात. मागील काही महिन्यांपासून श्री कोंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून जवळपास कामपूर्णत्वास आले आहे. श्री कोंडेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अधक्ष गणपत शंकर ठोसर यांनी आणि देवस्थानच्या पदाधिकारी यांनी मागील दोन वर्षांपासून सातत्याने मंदिरासाठी विविध व्यक्ती, संस्था, संघटना यांच्याकडे पाठपुरावा करून निधी आणि वस्तू स्वरूपात मदत मिळवून मंदिराचे काम पूर्णत्वाकडे नेले आहे. ( Dilip Pethe offered a Silver Patra to Shivpindi at Kondeshwar Temple Jambavli Maval )
ट्रस्टचे अध्यक्ष गणपत ठोसर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप पेठे यांच्याकडे 2022 ते 2024 पर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. पेठे यांनीही शिवपिंडीसाठी चांदाचा पत्रा देण्याची भावना बोलून दाखवली होती, अखेर रविवारी (दि. 4 ऑगस्ट) रोजी विधीवत हा पत्रा अर्पण करण्यात आला. सोमवारी श्रावण मासाची सुरूवात होत असून दर सोमवारी येथे भाविकांची गर्दी होत असते. आता शिवलिंगावर चांदीचा पत्रा चढवल्यानंतर शिवपिंड अधिक सुंदर दिसेल.
ट्रस्टच्या मंदिर परिसराचा विकास –
जांबवली येथील हे कोंडेश्वर शिवमंदिर प्राचीन असून शिवकालीन असल्याचे सांगितले जाते. नाणे मावळचे आणि पर्यायाने मावळचे एक टोक असलेला हा प्रदेश डोंगराळ तितकाच निसर्ग संपन्न असा आहे. या गावातून गिर्यारोहकांचा आवडता ढाक बहिरी गड असून कोकणात उतरण्यासाठी पूर्वी येथील मार्गाचा अवलंब केला जायचा असे स्थानिक सांगतात. श्री कोंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून येथील मंदिराचा जीर्णोद्धार आणि परिसराच्या सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. 2022 पासून अजपर्यंत अनेक दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत केली असून त्यात, संजय जैन यांनी सुशोभिकरणासाठी 20 लक्ष रूपयांची देणगी दिली. तसेच, नितीन मराठे यांनी सभा मंडपसाठी मदत केली. दिलीप पेठे यांनी शिवपिंडीवर चांदीचा पत्रा अर्पण केला. प्रसिद्ध उद्योजक विलास काळोखे यांनी शिवपिंडीला वज्रलेप चढवला, तसेच अनिल पिल्ले यांनी देखील मंदिर विकासासाठी सहकार्य केल्याची माहिती अध्यक्ष गणपत ठोसर आणि पदाधिकाऱ्यांनी दिली.
अधिक वाचा –
– पवना धरणातून विसर्ग वाढविल्याने पवना नदीची पाणीपातळी वाढली, कोथूर्णे गावचा पूल पाण्याखाली
– मावळ तालुक्यातील ‘या’ दोन शाळांचा ‘लोकमान्य टिळक आदर्श शाळा’ पुरस्कार देऊन गौरव । Maval News
– महत्वाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन संकेतस्थळ सुरू, आता पटकन करता येणार अर्ज, पाहा वेबसाईट