Dainik Maval News : डीआरडीओ रक्षा मंत्रालयातर्फे 2002 साली संपादित केलेल्या शेलारवाडी आणि तळेगाव दाभाडे येथील जमिनींना वाढीव मोबदला मिळावा, यासाठी दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढा उभारला होता. यासंबंधीचा खटला जिल्हा न्यायालय वडगाव येथे सुरू होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे वाद-प्रतिवाद ऐकून तब्बल 22 वर्षांनंतर डीआरडीओला शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याचे निर्देश दिले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शेतकऱ्यांच्या बाजूने ॲड. विलास कुलकर्णी, ॲड. रितेश कुलकर्णी व ॲड. मुरकुटे साहेब यांनी बाजू मांडली. तर शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळवून देण्यासाठी लढा उभारण्यामागे स्वर्गीय आमदार दिगंबर भेगडे यांचे महत्वाचे योगदान होते. दिवंगत आमदार दिगंबर दादा भेगडे यांच्यासह शंकरराव शेलार, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी मंत्री बाळा भेगडे, बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे, गणेश भेगडे, रवींद्र भेगडे, स्वर्गीय पांडुरंग शेलार, स्वर्गीय काशिनाथ शेलार, स्वर्गीय हरिद्वार भेगडे;
विश्वनाथ काशिनाथ शेलार, उध्दवराव शेलार, पोपटराव भेगडे, बाळासाहेब शेलार, अशोकराव शेलार, लाहुमामा शेलार, किसन भेगडे, विठ्ठल भेगडे, वसंत भेगडे पाटील, अनंत चंद्रचुड, जगन्नाथ भेगडे, सतीश वाळुंज, गणेश पांडुरंग शेलार, दिलीप शेलार, योगेश शेलार, विश्वनाथ शेलार, अमित भेगडे, अतुल शेलार, निलेश भेगडे, अजित शेलार, संजय शेलार, श्रीकृष्ण भेगडे, अभिजीत भेगडे यांचेही योगदान लाभले. ( Direction to pay increased compensation to DRDO acquired lands at Shelarwadi and Talegaon Dabhade )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ दोन शाळांचा ‘लोकमान्य टिळक आदर्श शाळा’ पुरस्कार देऊन गौरव । Maval News
– महत्वाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन संकेतस्थळ सुरू, आता पटकन करता येणार अर्ज, पाहा वेबसाईट
– मोठी बातमी ! ताम्हिणी घाट रस्ता खचला, ‘या’ तारखेपर्यंत वाहतूक राहणार बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Tamhini Ghat