Dainik Maval News : काले-कुसगांव जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे सक्षम उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली दळवी हे अधिकृतरित्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मावळ तालुक्यातील एकमेव खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या काले – कुसगांव जिल्हा परिषद गटात अनेक इच्छुक उमेदवार आहे, तसेच भाजपातही अनेकजण या गटातून निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक आहे. परंतु पंचायत समिती मावळचे माजी सभापती राहिलेले ज्ञानेश्वर दळवी हे पक्षाचे जुणे-जाणते अन् निष्ठावंत कार्यकर्ते असून काले गणासह कुसगांव गणात असलेला दांडगा जनसंपर्क या जोरावर दळवी यांना पक्षाकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहे.
उच्च शिक्षित, सामाजिक प्रश्नांची जाण असणारे, नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि सर्वपक्षीयांसोबत चांगले संबंध असणारे ज्ञानेश्वर दळवी हे जनतेच्या दृष्टीकोनातून सर्वात प्रभावी उमेदवार ठरत आहे. केवळ निवडणुक आल्यानंतर जनतेत जाणारा उमेदवार नसून कायम जनसेवेत असणारा आणि जनतेत मिसळणारा नेता नव्हे कार्यकर्ता असा ज्ञानेश्वर दळवी यांचा लौकीक आहे.
गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
नुकताच ज्ञानेश्वर दळवी यांनी काले – कुसगांव जिल्हा जिल्हा परिषद गटात गावभेट संवाद दौरा केला होता. यावेळी सर्वच गावांत श्री. दळवी यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सोबत प्रत्येक गावात गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ यांच्या सोबत बैठक घेत श्री. दळवी यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. यातून जनसामान्यांसोबत त्यांची नाळ आणखीन घट्ट झाली आहे.
सभापती म्हणून केलेल्या कामांचा जनतेवर प्रभाव
पंचायत समितीचे सभापती म्हणून ज्ञानेश्वर दळवी यांनी केलेल्या विकासकामांची चर्चा आजही होते. संपूर्ण तालुक्यात त्यांच्या विकासकामांचा प्रभाव राहिला आहे. प्रामाणिक आणि निष्ठेने जनसेवा करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. गावखेड्यातील पायाभूत सुविधा सुधरविण्यासाठी त्यांनी नेटाने काम केले, तसेच शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील सुधारणा घडवून आणण्यासाठी सक्रीय सहभाग घेतला. यामुळे त्यांच्या कार्याचा सकारात्मक प्रभाव जनतेवर असून याच जोरावर ज्ञानेश्वर दळवी हे जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.
ज्ञानेश्वर दळवी हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास त्यांच्या विजयाची आशा नव्हे विश्वास पक्ष कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला वाटत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– तीर्थक्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू – वाचा अधिक
– नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका : उमेदवारी अर्जाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, ‘ही’ चूक बिलकूल करू नका
