चिमण्यांची संख्या वाढावी, त्यांना हक्काचे घरटे मिळावे यासाठी मोरया प्रतिष्ठान वडगाव आणि आविज् फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिमणी संवर्धन प्रकल्प राबवला जात आहे. याअंतर्गत मोरया प्रतिष्ठानच्या कार्यालयात कृत्रिम घरटी बनविण्याचे काम हाती घेऊन सुमारे 250 चिमण्यांची घरटी बनविण्यात आली होती. जागितक चिमणी दिवसाचे औचित्य साधून पक्षी संवर्धनासाठी गेल्या आठवड्याभरात नावनोंदणी केलेल्या सुमारे 150 नागरिकांना ही चिमण्यांची घरटी विनामूल्य भेट देण्यात आली. माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, आविज् फाऊंडेशनचे संस्थापक अविनाश नागरे, माजी नगरसेविका पूनम जाधव आणि वडगाव शहरातील पक्षीप्रेमी नागरिक उपस्थित होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
वृक्षतोड, सिमेंट काँक्रीटची जंगले, शेतीवरील औषध फवारणी, पाण्याचे प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण अशा सर्व पर्यावरण हानी करणाऱ्या गोष्टींमुळे निसर्गातील पशू पक्ष्यांचे जीवन संकटात आले आहे. त्यात जागतिक तापमानवाढ अर्थात वाढत्या उष्म्यामुळे चिमणी सारख्या नाजूक पक्षाचे अस्तित्व कमी होत चालले आहे. म्हणूनच चिमणी संवधर्नासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. ( distribution of artificial nests to bird lovers on occasion of world sparrow day at vadgaon maval )
सर्वांना लहानपणी जेवू घालताना आई-वडील ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा’ करून जेवू घालतात. परंतू सध्या हे घास भरवणं जरी होत असलं तरीही चिऊ आणि काऊ मात्र आपल्या सभोवताली सहजरित्या दिसत नाही. त्यातही पूर्वी सहज दिसून येणारी चिऊताई आता अगदी दिसेनाशी झालीये. आपल्या जैवसाखळीतून चिमणी अगदी नामशेष होईल की काय, अशी भिती निर्माण झालीये. याच चिमणी साठी 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सन 2024-25 आर्थिक वर्षाचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर, वाचा अंदाजपत्रकातील प्रमुख मुद्दे । Talegaon Dabhade
– ‘विजय शिवतारेंनी अजित पवारांची माफी मागावी नाहीतर…’, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आक्रमक भूमिका
– लोकसभा निवडणूक काळात कुणीही आचारसंहितेचा भंग केल्यास ‘या’ नंबरवर फोन करून करा तक्रार । Lok Sabha Election 2024 Code of Conduct