मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष तसेच पुणे पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक बबनराव भेगडे यांचा 67वा वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम न घेता वृक्ष संवर्धनासाठी हरणेश्वर टेकडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांसोबत वृक्षारोपण करून भेगडे यांनी वाढदिवस साजरा केला. कार्यक्रमाचे नियोजन पुणे पीपल्स को ऑप बँकेचे तज्ञ संचालक कौस्तुभ भेगडे, श्री डोळसनाथ महाराज पतसंस्थेचे संचालक शंकर छबुराव भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे मित्र परिवार आदींनी केले होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
भेगडे यांच्या निवासस्थानी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, सहकार, वैद्यकीय, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यामध्ये मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, लोकसभेचे इच्छुक उमेदवार संजोग वाघेरे, बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे, गणेश भेगडे, बबनराव भोंगाडे, सुरेश धोत्रे, रवींद्र भेगडे, गणेश काकडे, संतोष भेगडे, संतोष मुऱ्हे, कैलास हुलावळे, अंकुश आंबेकर, अतुल राऊत, दत्तात्रय पडवळ, संजय खांडेभराड, गणेशआप्पा ढोरे, विकास कंद, शिवाजी टिळेकर, कृष्णा दाभोळे, प्रवीण झेंडे, अभिजित काळोखे, शिवाजी असवले;
शरद भोंगाडे, किशोर भेगडे, सुनील दाभाडे, नंदकुमार कोतूळकर, सुनील भोंगाडे, सुभाष जाधव, राहुल पारगे, सुदर्शन खांडगे, रामभाऊ गवारे, विक्रम कदम, आशिष खांडगे, निलेश राक्षे, नामदेव शेलार, शरद हुलावळे, मिकी कोचर, विशाल वाकडकर, विठ्ठलराव शिंदे, शैलजा काळोखे, दिपाली गराडे तसेच तळेगाव व चाकण एमआयडीसीमधील कंपन्यांचे प्रतिनिधी, सहकार क्षेत्रातील अधिकारी, मावळ तालुक्यातील पत्रकार बंधू आणि श्री डोळसनाथ नागरी सह पतसंस्थेचे सर्व संचालक, मावळ तालुक्यातील विविध राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. ( Nationalist Congress Party Maval Taluka Former President Babanrao Bhegde Birthday )
अधिक वाचा –
– ‘विजय शिवतारेंनी अजित पवारांची माफी मागावी नाहीतर…’, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आक्रमक भूमिका
– लोकसभा निवडणूक काळात कुणीही आचारसंहितेचा भंग केल्यास ‘या’ नंबरवर फोन करून करा तक्रार । Lok Sabha Election 2024 Code of Conduct
– लोकसभा निवडणूकीदरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वडगाव मावळ पोलिसांचा रुटमार्च । Vadgaon Maval Police Route March