प्रत्येक आई-वडील आपल्या बाळाचा पहिला वाढदिवस अतिशय थाटामाटात साजरा करीत असतात. याप्रसंगी लागेल तितका खर्चही केला जातो. परंतु जगतगुरु संत तुकारामांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या देहू गावातील निरंजन मोरे आणि काजल मोरे यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन आपल्या बालिकेचा म्हणजेच कौतुकाचा पहिला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी आपले वडील जयसिंग मोरे आणि आई नलिनी मोरे यांच्या प्रेरणेने आणि विचाराने जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांना ज्ञान मिळावे या उद्देशाने आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना वाचनालयासाठी पुस्तकांचे वाटप केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मोरे परिवाराने मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दवणेवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फळणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजगाव पठार (डोंगरवाडी), आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कचरेवाडी या शाळांसाठी पुस्तकांचे वाटप केले. वाढदिवसासाठी होणारा खर्च टाळून मोरे परिवारांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संतांची चरित्रे, थोर व्यक्तींचे चरित्रे, लहान मुलांच्या गोष्टी,बोधकथा, इंग्रजी भाषेतील विविध पुस्तके, शब्दकोडी, सामान्य ज्ञान आदी विषयावर आधारित विविध पुस्तकांचे वितरण याप्रसंगी केले. ( Distribution of books in school on occasion of birthday dehu maval )
सदर कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दवणेवाडी केंद्र वडेश्वर तालुका मावळ या शाळेत आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डोंगरवाडी शाळेचे मुख्याध्यापक मल्लिकार्जुन कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दवणेवाडी शाळेचे मुख्याध्यापक रमेश गुळवे यांनी केले. सर्व उपस्थितांचे स्वागत सहशिक्षक काळू गुणाट यांनी केले तर आभार प्रदर्शनाचे काम फळणे शाळेचे सहशिक्षक अजय शेळवणे यांनी केले.
याप्रसंगी निरंजन मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त शाळेसाठी पुस्तक वाटण्याची संकल्पना माझ्या आई-वडिलांनी मला दिली आणि आज प्रत्यक्ष ज्ञानरूपी धन वाटल्याने मला आनंद होत आहे आणि खऱ्या अर्थाने शाळेतील मुलांच्या मध्ये माझ्या मुलीचा वाढदिवस साजरा करीत असल्याचे खूप मोठे समाधान आम्हा मोरे परिवाराला लाभत आहे. या कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल त्यांनी सर्व उपस्थित शिक्षकांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– पांदण रस्ता खुला करण्यासाठी टाकवे ग्रामस्थ आक्रमक; जलजीवन मिशनचे काम अडवले । Maval Taluka
– जिल्हा बँकेच्या संचालकांवर दोन वर्षांच्या आत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही!
– आरपीआय आठवले गटाचे सूर्यकांत वाघमारे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड । Pune District Planning Committee