Dainik Maval News : रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच यांच्या तर्फे मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या, सन्मानीय व्यक्तिमत्वांचा मावळरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. वडगाव मावळ येथे रविवारी (दि. १ सप्टेंबर) रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या सन्मानमूर्तींमध्ये ह.भ.प. डॉ.सदानंद मोरे (संत साहित्य), रामदास (आप्पा) काकडे (उद्योग), ह.भ.प.बाळासाहेब महाराज काशीद (अध्यात्म), सूर्यकांत वाघमारे (समाजकारण), श्रीमती सुरेखाताई जाधव (समाजकारण), रामनाथशेठ वारिंगे (बैलगाडा क्षेत्र), सेजल विश्वनाथ मोईकर (क्रीडा) या सन्मानीय स्थानिक मावळवासीयांना समारंभपूर्वक गौरविण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
याप्रसंगी, मनोगत व्यक्त करताना रविंद्र भेगडे म्हणाले, “मावळ तालुका हा जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी या भूमीसाठी योगदान देऊन , मावळचा नावलौकिक वाढवला. याच ,विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या , सन्मानीय व्यक्तिमत्वांच्या गौरव करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने मावळरत्न पुरस्कार सन्मान सोहळा आज संपन्न होत आहे. वरील सन्मानीय मान्यवरांच्या कर्तुत्ववाने इतर जण प्रेरणा घेतील आणि मावळची घौडदौड अशीच कायम राहील ” ( Distribution of Maval Ratna Award at Vadgaon Maval )
याप्रसंगी माजी राज्यमंत्री मदन बाफना साहेब, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, पुणे जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते चंद्रकांत सातकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक ज्ञानेश्वर दाभाडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे, भाजपा तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘प्रसाद गोसावी’ अवयवदान करणारा पहिला पत्रकार ! मृत्यूशी झुंज अपयशी पण… अजूनही धडधडतंय हृदय ! Pune News
– स्पर्धात्मक युगाचे आव्हान पेलणारा विद्यार्थी घडविणे ही काळाची गरज – आमदार सुनिल शेळके
– राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा ; केंद्र शासनाकडून कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी