Dainik Maval News : कामशेत (kamshet maval) येथे डॉ. युवराज कदम सह पशुधन कृती समिती मावळ यांच्या वतीने ‘पशुधन पुरस्कार-2024’ (Pashudhan Award 2024) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उत्कृष्ट गाय, उत्कृष्ट खिलार बैल, उत्कृष्ट गोठा, उत्कृष्ट म्हैस अशी विविध बक्षिसे पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय, पशुपालन हा आता जोडधंदा राहिला नसून ग्रामीण भागातील एक प्रमुख व्यवसाय बनला आहे. पशुसंवर्धनात ग्रामीण अर्थव्यवस्थेला गतिमान करण्याची क्षमता आहे. अशा पशुधन पुरस्कारांमुळे शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन मिळते, असे यावेळी आमदार सुनिल शेळके म्हणाले. ( Distribution of Pashudhan Award 2024 by MLA Sunil Shelke at Kamshet )
या कार्यक्रमाला आमदार शेळके यांसह शिवसेना उबाठा पक्षाचे संघटक संजोग वाघेरे, डॉ. अनिल परंडवाल, डॉ. सतीश भोसले, डॉ. रूपाली दडके, डॉ. बाळासाहेब वाघमोडे, डॉ. श्रेयस भंडारी, डॉ. विजय मोरे, डॉ. धनाजी पवार, श्री. सुनिलनाना भोंगाडे, राकेश घारे, पप्पु चांदेकर, अविनाश गराडे आदी मान्यवर आणि शेतकरी बंधु उपस्थित होते.
अधिक वाचा –
– लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता जमा ; लवकरच राज्यात ‘लाडका शेतकरी अभियान’
– रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीने घेतला जगाचा निरोप, वडगाव येथील आदर्श शिक्षिका दीपाली गुजराथी यांचे निधन । Vadgaon Maval
– ‘शादी डॉट कॉम’वर झालेल्या ओळखीतून लोणावळ्यात फिरायला आलेल्या महिलेला 3 लाख 95 हजाराचा गंडा । Lonavala Crime