Dainik Maval News : सेतू बंधन ट्रस्ट यांच्या वतीने मावळ तालुक्यातील भोयरे येथील फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना केशर आंबा रोपाचे वाटप करण्यात आले आहे.
ट्रस्टच्या या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात गावपातळीवर सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी ट्रस्ट सोबत प्रयत्नशील राहणार असल्याचे मा सरपंच बळीराम भोइरकर यांनी सांगितले.
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सेतु बंधन ट्रस्ट वतीने मावळ तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात लोकसहभागातून सामाजिक शैक्षणिक आरोग्य तसेच आर्थिक विकासासाठी काम करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष पार्थ सारथी मुखर्जी यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमात गावातील प्रगतशील शेतकऱ्यांना केशर आंबा रोपाचे वाटप श्रद्धा वाळके, तन्मय वाळके यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत, आभार तन्मय वाळके यांनी मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पवना धरणावर धोकादायक पद्धतीने डागडुजी ; धरण 75 टक्के भरलेले असताना सांडव्यावर क्रेन चढवून दुरुस्तीचे काम । Pavana Dam
– लम्पी चर्मरोग प्रादूर्भावामुळे मावळ तालुक्यातील पशूधन धोक्यात ; तातडीने लसीकरण मोहीम हाती घेण्याबाबत प्रशासनाला निवेदन । Maval News
– लोणावळा बस स्थानकाचे रूपडे पालटणार ! टेंडर प्रक्रिया पूर्ण करून लवकर काम सुरू होणार ; परिवहन मंत्र्यांचे आश्वासन । Lonavala News