व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात चारसूत्री पद्धतीने भात लागवड जोमात ; कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांचा निर्णय । Maval

पवन मावळ विभागात भात लागवडी सुरु आहेत. शेतकरी आधुनिक पद्धतीने लागवडी करू लागले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 9, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Rice cultivation in Maval taluka using New method Farmers try to increase production

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात ग्रामीण भागात सध्या भात लागवडीचा हंगाम सुरू आहे. चांगल्या पद्धतीने वाढलेल्या भात रोपांची योग्य प्रकारे लागवड करण्यात शेतकरी वर्ग मग्न आहे. पावसाचे वातावरण सुसह्य असल्याने लवकरात लवकर भात लागवड पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. पवन मावळ परिसरात भात लागवडींनी वेग घेतला असून कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार येथील बहुतांश शेतकरी चारसूत्री पद्धतीने भात लागवड करीत आहेत.

  • मावळ तालुक्याला भाताचे कोठार समजले जाते. पवन मावळातील सोमाटणे भागातील अनेक गावांतील शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करीत आहेत. सध्या पडत असलेला पाऊस भात पिकासाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांनी भात लागवडी सुरू केल्या असून येथील शेतकरी चारसूत्री पद्धतीने भात लागवड करीत आहेत. येथील शेतकरी रामदास सोरटे यांनी दोन एकर क्षेत्रावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड केली असून यातून उत्पादन वाढीची अपेक्षा वर्तवली आहे.

अशी केली जाते चारसूत्री भात लागवड :
दोरीच्या सहाय्याने चारसूत्री पद्धतीने भात लागवड केली जाते. 25 बाय 25 सेंमी अंतरावर दोरी तयार करून रोपे लावली जातात. रोप लागवडी नंतर यूरिया ब्रिकेट खत गोळ्याचा वापर चार चूडाच्या मधे एक गोळी अशा प्रकारे केला जातो. लागवडीच्या दोन ते तीन दिवसानंतर ही मात्रा दिली जाते. या पद्धतीने भात लागवड केल्यास कमी भात रोपे लागत असल्याने ही पद्धत परवडणारी आहे.

सद्यस्थितीत साळूंब्रे, गोडुंब्रे, शिरगाव, सांगवडे, गहूंजे, दारुंब्रे परिसरात 200 हेक्टर क्षेत्रावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड केली जाणार असल्याचे सहायक कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी सांगितले.

पवन मावळ विभागात भात लागवडी सुरु आहेत. शेतकरी आधुनिक पद्धतीने लागवडी करू लागले आहेत. चारसूत्री, एस.आर.टी., यंत्राद्वारे भात लागवड अशा पद्धतींचा अवलंब शेतकरी करू लागले आहेत. नवनवीन तंत्रज्ञान वापरून भात उत्पादनात वाढ करणे हेच कृषी विभागाचे ध्येय आहे, असे सहाय्यक कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पवना धरणावर धोकादायक पद्धतीने डागडुजी ; धरण 75 टक्के भरलेले असताना सांडव्यावर क्रेन चढवून दुरुस्तीचे काम । Pavana Dam
– लम्पी चर्मरोग प्रादूर्भावामुळे मावळ तालुक्यातील पशूधन धोक्यात ; तातडीने लसीकरण मोहीम हाती घेण्याबाबत प्रशासनाला निवेदन । Maval News
– लोणावळा बस स्थानकाचे रूपडे पालटणार ! टेंडर प्रक्रिया पूर्ण करून लवकर काम सुरू होणार ; परिवहन मंत्र्यांचे आश्वासन । Lonavala News


Previous Post

राज्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत १६ पिकांसाठी पीकस्पर्धा जाहीर – वाचा सविस्तर

Next Post

भोयरे येथील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी केशर आंबा रोपांचे वाटप । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Distribution of saffron mango seedlings to farmers in Bhoyre Village for orchard cultivation

भोयरे येथील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी केशर आंबा रोपांचे वाटप । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

May 11, 2026
Jail-And-Court

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

May 11, 2026
woman died after falling from eighth floor incident at Katvi in ​​Vadgaon Maval area

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

May 11, 2026
Neelam Gorhe held an administration meeting regarding rape of a minor girl in Pawana Dam area ​​Lonavala

लोणावळा ग्रामीण हद्दीत पवना डॅम परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली प्रशासनाची बैठक

May 11, 2026
Sainath Varghade from Ardav Maval has passed 10th exam after 26 years by solving English subject

‘इंग्रजी’ भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे ‘साईनाथभाऊ’ झाले दहावी पास

May 10, 2026
Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.