Dainik Maval News : संत तुकाराम सहकारी साखर कारखाना यंदा उसाची सतरा लाख रोपे तयार करणार आहे. आजपर्यंत सोळा लाख रोपे तयार झाली आहेत. तर अकरा लाख रोपांचे वितरण पूर्ण झाले आहे. याबाबत कारखान्याच्या कृषी विकास अधिकारी प्रदीप सावंत यांनी माहिती दिली.
शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची रोपे मिळावीत, यातून ऊस उत्पादन वाढावे यासाठी कारखान्याच्या कृषी विभागातर्फे ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर रोपवाटिका उपक्रम राबवला जातो. येथे यावर्षी ‘पीडीएन-१५०२’, ‘सीओएम-०२६५’, ‘८६०३२’ आदी जातीची आजअखेर सोळा लाख रोपे तयार करण्यात आली आहेत.
महिनाभरात आणखी एक लाख रोपे तयार केली जाणार आहेत. ‘‘अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी साधारण त्रिसरी पद्धतीने रोपांची लावणी केल्यास सरासरी एका एकरासाठी पाच हजार रोपे पुरेशी होतात. ही सर्व रोपे कारखान्याच्या रोपवाटिकेत माती विशवीत तयार केली जातात,’’ अशी माहिती सावंत यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा