व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आंबवणे येथे लोणावळा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न । Lonavala News

लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर आंबवणे येथे संपन्न झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 26, 2025
in ग्रामीण, लोकल, शहर
NSS Camp of College of Arts Commerce and Science of Lonavla Education Trust concluded at Ambwane Village

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर आंबवणे येथे संपन्न झाले. शिबिरात विविध उपक्रम राबविण्यात आले. यात, किल्ले कोराईगड येथे स्वच्छता मोहीम राबवून दुर्गसंवर्धनाचे कार्य करण्यात आले. गावात प्रभातफेरी काढून स्वच्छतेचा जागर करण्यात आला. तसेच व्यसन मुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, लेक वाचवा लेक शिकवा, संविधान जनजागृती संदेश देण्यात आला.

महाविद्यालयाच्या सात दिवसीय शिबिरात, शिबिरार्थी स्वयंसेवकांसाठी राजेंद्र दिवेकर, डॉ. संदिप सोनटक्के, भारत बबन, अपूर्व मराठे, शुभांगी भुजबळ, शिला साने, प्रा. संजय साळुंके या वक्त्यांची व्याख्याने संपन्न झाली. शनिवारी (दि.२२) शिबिराचा निरोप समारंभ पार पडला. याप्रसंगी, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक नंदकुमार वाळंज, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख उपस्थित होते.

  • कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. पवन शिनगारे यांनी शिबिराचा अहवाल मांडला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मनोगते मांडली. तदनंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार कथन केले. जीवनात पुढे जात असताना आपल्या आई वडिलांचे उपकार कधीही विसरू नका, असे मार्गदर्शन नंदकुमार वाळंज यांनी केले, तसेच विद्यार्थ्यांनी गावात राबविलेल्या स्वच्छता अभियानाचे कौतूक केले. प्राचार्य डॉ. देशमुख यांनी स्वयंसेवकांना संघटीत राहून कार्य करण्याचे महत्व सांगितले. सरपंच सीता कराडे यांनी स्वयंसेवकांनी गावासाठी केलेल्या कामाचा गौरव केला.

शिबिराचे आयोजन प्रा. धनराज पाटील (कार्यक्रम अधिकारी), प्रा. पवन शिनगारे, प्रा. भूषण गोंदके यांनी केले होते. निरोप समारंभ प्रसंगी उपप्राचार्य विलास पाटील, ऍनि वर्गिस, मुख्याध्यापक भटू देवरे, प्रा. साळुंखे, प्रा. काटकर, प्रा. वर्तक उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा 


dainik maval jahirat

Previous Post

ऊस उत्पादन वाढविण्यासाठी संत तुकाराम साखर कारखान्याकडून रोपांचे वाटप । Maval News

Next Post

तळेगाव-बोरिवली आणि तळेगाव-दादर एसटी सेवा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
ST-Bus

तळेगाव-बोरिवली आणि तळेगाव-दादर एसटी सेवा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.