Dainik Maval News : लोणावळा येथील गवळीवाडा विभागातील लहानग्यांनी श्रीराम मंडळाच्या माध्यमातून घराघरातून फराळ गोळा करून तो सर्व फराळ खंडाळा येथील अंध वृद्धाश्रमात वाटप केला.
श्रीराम मंडळ, गवळीवाडा यांच्यावतीने दरवर्षी नरक चतुर्दशीच्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात येतो. मात्र यंदा येथील लहानग्या चमूने या कामात पुढाकार घेतला होता. खंडाळा अंध वृद्धाश्रमात 79 अंधवृद्ध राहत आहेत.
दिवाळी मध्ये घरोघरी विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ आणि गोडधोड केले जाते. अंध वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना देखील या फराळाचा आनंद घेता यावा हा या उपक्रमाचा मूळ उद्देश असल्याचे माजी नगरसेवक निखिल कवीश्वर यांनी सांगितले.
फराळ वाटपाच्या निमित्ताने या लहान मुलांनी अंध वृद्धांची भेट घेतली. याठिकाणी ते कशा पद्धतीने जीवन जगतात याची माहिती घेतली. त्यांची त्या ठिकाणी असलेली राहण्याची, जेवणाची व्यवस्था कशी असते याची माहिती घेतली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 12 उमेदवारांचे अर्ज वैध, 6 उमेदवारांचे अर्ज बाद ; पाहा बारा उमेदवारांची नावे आणि पक्ष
– चोरीच्या संशयावरून तरुणाचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime
– नवीन प्रशासकीय इमारत वाढविणार मावळ तालुक्याच्या राजधानीची शोभा !