Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिवाळी सणानिमित्त कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात येत आहे. मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूर या तालुक्यात कारखान्याचे कार्यक्षेत्र असून या भागातील सभासद शेतकऱ्यांना साखर वाटप करण्यात आली आहे.
कारखान्याच्या वतीने गटा गटामध्ये जाऊन सभासद शेतकऱ्यांना साखर वाटप करण्याचे काम सुरु आहे. पवनानगर – सोमाटणे गटातील सभासद शेतकऱ्यांना देखील सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात आली. यावेळी कारखान्याचे संचालक सखाराम गायकवाड, नरेंद्र ठाकर, शिवाजी पवार, सुभाष जाधव, शामराव राक्षे, सुनील काळे, किसन कदम, संजय मोहोळ, मोहन घरदाळे, सुनिल घरदाळे, सुरेश आडकर, लहु कालेकर, नवनाथ जांभुळकर, जालिंदर जांभुळकर, प्रकाश आडकर यांसह पवनमावळ परिसरातील शेतकरी उपस्थितीत होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अवघ्या दोन सेकंदाच्या व्हिडिओमुळे लागला ‘त्याचा’ शोध ; शिवदुर्ग रेस्कू टीमच्या अनुभवाचा कस पाहणारे सर्च ऑपरेशन यशस्वी !
– ‘मी दुर्गा’ बेस्ट सेल्फी आणि रिल्स स्पर्धेतील विजेत्या प्रतिभा थोरात यांचा सन्मान । Vadgaon Maval
– कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात? कोजागिरी शब्दाचा अर्थ काय? कोजागिरी पौर्णिमेला दूध का पितात? जाणून घ्या सर्वकाही