Dainik Maval News : लोणावळा शहराजवळील औंढे या गावातील नागनाथ माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षिका शांता मारुती मंडले यांना नुकताच पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी या ठिकाणी हा पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला.
पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी दैनिक संपादक संजय आवटे, आमदार महेश लांडगे यांचे प्रतिनिधी, शिक्षक आमदार भगवान साळुंखे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड, संभाजी पडवळ, सुबोध गलांडे, शिवाजी कामथे, सुजित जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
शांता मंडले यांची 21 वर्षे अध्यापन सेवा झाली आहे. आठ वर्ष शिक्षक व उर्वरित काळात मुख्याध्यापक म्हणून त्यांनी सेवा बजावले आहे. विद्यार्थी प्रेमी शिक्षिका म्हणून ओळख असलेल्या शांता मंडले यांना यापूर्वी देखील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्या सदैव कार्य मग्न असतात.
लोणावळा ग्रामीण महिला दक्षता समितीच्या त्या सदस्य असल्याने शिक्षणासोबतच परिसरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना गुड टच, बॅड टच याविषयीची माहिती तसेच मुली व महिला सुरक्षेबाबतची जनजागृती त्या करत असतात. नागनाथ माध्यमिक विद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या त्या शिक्षिका आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अवघ्या दोन सेकंदाच्या व्हिडिओमुळे लागला ‘त्याचा’ शोध ; शिवदुर्ग रेस्कू टीमच्या अनुभवाचा कस पाहणारे सर्च ऑपरेशन यशस्वी !
– ‘मी दुर्गा’ बेस्ट सेल्फी आणि रिल्स स्पर्धेतील विजेत्या प्रतिभा थोरात यांचा सन्मान । Vadgaon Maval
– कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात? कोजागिरी शब्दाचा अर्थ काय? कोजागिरी पौर्णिमेला दूध का पितात? जाणून घ्या सर्वकाही