मावळ तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ शहरात दिव्यांग मेळावा ( Divyang Melava Vadgaon Maval ) आयोजित करण्यात आला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर मेळाव्यात मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने गरजू दिव्यांग लाभार्थ्यांना व्हिलचेअर, स्टिक आदी आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. मावळ तालुक्यातील अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी या पार्श्वभूमीवर अंत्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग मेळाव्याला उपस्थित रहावे.
हेही वाचा – महत्वाची बातमी! दिनांक 4 डिसेंबर रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन, बेरोजगारांना नोकरींची सुवर्णसंधी
तसेच, ज्या ज्या दिव्यांग बांधवांना-भगिनींना सदर योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी दिनांक 5 डिसेंबर रोजी मुळ रेशन कार्ड, रेशन कार्ड मध्ये समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींचे आधार कार्ड झेरॉक्स, दिव्यांग सर्टिफिकेट, एक पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रे घेऊन उपस्थित रहावे, अशी सुचना करण्यात आली आहे. वडगाव मावळ शासकीय विश्रामगृह येथे हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती सुभाष शेडगे (अध्यक्ष – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग आघाडी) आणि सारिका ढमाले (मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग आघाडी महिला अध्यक्ष) यांनी दिली.
अधिक वाचा –
– ग्रामपंचायत निवडणूक : 23 डिसेंबरपर्यंत जवळ शस्त्र बाळगण्यास मनाई, कलम 144 लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, वाचा
– प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील 251 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष वर्क ऑर्डरचे वाटप