दिवाळी सण म्हटलं की सर्वांच्या डोळ्यांसमोर येते ती दिव्यांची रोषणाई, चमचमीत फराळ आणि नात्यांची वीन अधिक घट्ट करणारे छोटेमोठे सण. परंतू या पलीकडेही दिवाळीचे एक खास वैशिष्ट्ये असते, ज्याचा संबंध महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि इतिहासाशी आहे, ते म्हणजे किल्ले बनवणे.
दिवाळी म्हटलं की बच्चे कंपनीसाठी मोठा उत्साहाचा कालखंड असतो. याकाळात शाळांना तर सुटी असतेच सोबत घरीही आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. अशात फराळ आणि फटाके यांच्या जोडीला आनंद असतो तो किल्ले बनवण्याचा. महाराष्ट्रात अगदी खेडोपाड्यांपासून ते शहरांपर्यंत किल्ले बनवण्याचा उत्साह दिसून येतो. फक्त लहान मुलांमध्येच नाही तर प्रौढांमध्येही किल्ले बनवण्याची हौस असते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
किल्ले म्हटलं की त्यावर सैनिक आले, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती आली. त्यामुळे दिवाळीत बनवल्या जाणाऱ्या किल्ल्यांवर ठेवण्यासाठी लागणारे हजारो सैनिक, विविध पुतळे बनवण्यासाठी दिवाळीपुर्वीच ते तयार करण्यासाठी कुंभार बांधव तयारी करत असतात. सध्या दिवाळीसाठी काही दिवसच शिल्लक राहिलेत. अशात लवकरात लवकर सैनिक, पुतळे रंगवून ते तयार करण्यासाठी आणि बाजारात नेऊन विकण्यासाठी अनेक ठिकाणी कुंभार बांधवांची घाई-गडबड सुरु असलेली दिसत आहे.
View this post on Instagram
मावळ तालुक्यातील पवनमावळ भागातील शिळींब गावात असलेले कुंभार बांधव अनेक पिढ्यांपासून हा व्यवसाय करत आहेत. दिवाळीत किल्ल्यांवर ठेवण्यासाठी लागणारे सैनिक बनवणे, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती, रेडिमेड किल्ले, दिवाळीत लक्ष्मी पुजनासाठी लक्ष्मी मातेची मूर्ती यांसह हौशी लोकांना घरात ठेवण्यासाठी लागणाऱ्या विविध मूर्ती बनवणे आदींची तयारी हे सर्वजण दिवाळीच्या कित्येक महिने अगोदरच करत असतात. सध्या येथील काम अंतिम टप्प्यात आले असून हा सर्व तयार माल लवकरच बाजारात विक्रीसाठी नेणार असल्याची माहिती भगवान दरेकर, बाळू दरेकर, शुभम दरेकर, भावेश दरेकर, शिवाजी दरेकर, शंकर दरेकर, एकनाथ दरेकर, रोहित दरेकर, अर्जून दरेकर, संतोष दरेकर यांनी दिली.
किल्ले हा महाराष्ट्राचा जिवंत इतिहास आणि वैभवशाली संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे हे किल्ले राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक पिढीला जगण्याची, संघर्षासाठीची प्रेरणा देतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास म्हणजे जिवनातील कोणत्याही परिस्थितीत खंबीर पणे उभे राहायला आणि जगायला शिकवणारे विद्यापीठच आहे. अशा या आपल्या तेजस्वी इतिहासाची आठवण जपणे आणि त्या आठवणी जागवणे, पुढच्या पिढीला त्याची जाणीव करुन देणे यासाठीच दिवाळीत किल्ले बनवायची परंपरा जणू सुरु झाली असावी. ( Dainik Maval Diwali 2022 Special Maval Taluka Pottery Kumbhar Society Mud forts soldier statues )
अधिक वाचा –
मावळमध्ये कृषी विभागाच्या प्रयत्नांना यश, नियोजनात्मक शेतीमुळे भातपिक जोमात, पावसाच्या तडाख्यापासूनही बचाव
गुलाल उधळला ! चांदखेड ग्रामपंचायतीवर ‘या’ पॅनेलची सत्ता, मीना माळी थेट जनतेतून सरपंच, वाचा संपूर्ण निकाल
शिळींबमध्ये चोरट्यांनी दुकान फोडलं, गावातल्या मुख्य चौकातील किराणा दुकानातून हजारोंचा माल लंपास