पुण्यश्लोक श्रीराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि धर्मरक्षा समिती खराळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी पाड्यावर जाऊन दिवाळी साजरी करण्यात येते. यंदा या उपक्रमाचे नववे वर्ष होते. त्यानिमित्त यंदा मावळ तालुक्यातील पिंपलोळी ह्या गावातील कातकरी आदिवासी समाज राहणाऱ्या वस्तीवर उपक्रम राबवण्यात आला. सुमारे 230 लोकसंख्येची असलेली ही आदिवासी वस्ती आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
फराळ, गृह उपयोगी साहित्य, कपडे ,साड्या व शालेय साहित्याचेही वाटप करण्यात आले. फटाके उडवून लहान मुलांनी दिवाळी चा आनंद लुटला. पवना धरण आणि पर्यटन स्थळांच्या जवळ असूनही ही वस्ती विकासापासून वंचित आहे. आर्थिकरित्या उच्च अशा समाजाचा आपण भाग नाहीच अश्या परिस्थितीमध्ये हे कातकरी समाज बांधव जीवन जगत आहेत. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करून पुण्यश्लोक श्री राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान खराळवाडी व धर्म रक्षा समिती खराळवाडी यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ( diwali celebration at tribal area in Pimpoli village Maval )
अधिक वाचा –
– शिळींब गावात भरली एसआरटी भात पीक उत्पादन शेतीशाळा; युवा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी अशोक साबळे; पंडित पाटील यांची सांगली जिल्ह्यात बदली
– मावळ तालुक्यातील बहुचर्चित वाकसई ग्रामपंचायतीची निवडणूक 20 डिसेंबरला, वाचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम