Dainik Maval News : गेल्या तीस वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल तळेगाव दाभाडे येथील डॉ. लक्ष्मणराव कार्ले यांना कर्मवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
अहमदपूर (जि. लातूर) येथे आयोजित राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलनात भाजपा नेते दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते डॉ. कार्ले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, संमेलनाचे अध्यक्ष कवी विलासराव सिगीकर, माजी आमदार रामभाऊ गुडीले, संमेलनाचे आयोजक ऍड. बी. आर. कलवले यांसह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. लक्ष्मण कार्ले हे गेल्या तीस वर्षांपासून गरीब, गरजू रुग्णांना चांगली आरोग्यसेवा मिळावी, यासाठी कार्य करीत आहेत. कोरोना काळात भीतीच्या सावटाखाली असलेल्या गरीब, गरजू रुग्णांच्या घरी जाऊन अल्प दरात औषधोपचार देण्याचे कामही त्यांनी केले. वयाच्या पंचाहत्तरीत देखील रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून त्यांचे कार्य सुरू आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा