व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवान सोहेल शेख याला रौप्य पदक

महाराष्ट्रात मानाची समजली मानली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने २२ ते २३ फेब्रुवारी दरम्यान पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथे संपन्न झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 25, 2025
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र
Maharashtra Kesari Wrestling Tournament Silver medal to wrestler Sohail Shaikh

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्रात मानाची समजली मानली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने २२ ते २३ फेब्रुवारी दरम्यान पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथे संपन्न झाली.

यात रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना ५५ किलो वजनी गटात कुस्तीमहर्षी भाऊ साहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोलीचा तरुण व मेहनती पैलवान सोहेल शेख याने पहिल्या ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी स्पर्धेत वरिष्ठ गटातील कोल्हापुर, पुणे, नाशिक, सोलापुर येथील नामवंत मल्लांना अस्मान दाखवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

  • अंतिम फेरीत अगदी शेवटच्या क्षणी सुवर्ण पदकाने हुलकावणी जरी दिली असली तरी तमाम प्रेक्षकांची मने जिंकत सोहेल यानी रौप्य पदकाची कमाई केली. विशेष म्हणजे सोहेल हा या स्पर्धेतील वयाने सर्वात लहान मल्ल असून ही त्याची वरिष्ठ गटातील पहिलीच स्पर्धा होती.

सोहेल याला कुस्तीमहर्षी भाऊ साहेब कुंभार कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष तथा शासनाचा गुणवंत क्रीड़ा मार्गदर्शक पुरस्कार विजेते राजाराम कुंभार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. सोहेल सध्या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या कांदिवली येथील कुस्ती सेंटरमध्ये महाराष्ट्र शासनाचे कुस्ती कोच अमोल यादव, राजसिंग चिकारा, शाम बुट्टा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

रायगड जिल्ह्यासाठी ग्रीको रोमन प्रकारात महाराष्ट्र केसरीचे पहिलेच पदक पटकावण्याचा पराक्रम सोहेल याने केला आहे. या यशामुळे कर्जत खालापुरचे आमदार महेंद्र सदाशिव थोरवे, खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण, तहसीलदार अयुब तांबोळी, खालापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील, खोपोली पोलिस निरीक्षक शीतल राउत, खालापुर पोलिस निरीक्षक सचिन पवार,रायगड जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालयाचे क्रीड़ा अधिकारी राजेन्द्र अतनुर, प्रकाश वाघ, राज्य क्रीड़ा मार्गदर्शक संदीप वांजळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मारुती आड़कर, खालापुर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष डॉ सुनील पाटिल आणि सचिव जगदीश मरागजे इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा


Previous Post

तळेगाव दाभाडे येथील डॉ. लक्ष्मणराव कार्ले यांचा कर्मवीर पुरस्काराने गौरव । Talegaon Dabhade

Next Post

नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 3 हजार रुपये वाढविणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chief Minister Devendra Fadnavis

नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 3 हजार रुपये वाढविणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.