रेवदंडा येथील डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या ( Dr Shri Nanasaheb Dharmadhikari Pratishthan ) पुणे येथील श्री सदस्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी निर्माल्य संकलनाचा ( Nirmalya Collection Pune ) कौतुकास्पद उपक्रम राबवला. यंदा पुणे ( Pune ) येथील श्री सदस्यांनी गरवारे विद्यालयाजवळ हजारो किलो निर्माल्य संकलन केले, ज्याची पर्यावरण पुरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
पुणे शहरात होणार गणेशोत्सव हा अत्यंत भव्यदिव्य असतो. अनेक सार्वजनिक मंडळांसह घरोघरी गणेशाचे आगमन होते. त्यामुळे गणेश विसर्जन म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गणेशाच्या विसर्जनासाठी पुणेकर बाहेर पडतात. यावेळी गणेशाच्या विसर्जनासोबत निर्माल्य देखील नदीत अथवा कृत्रिम हौदात टाकले जाते. परंतू, नदीत टाकलेल्या निर्माल्याने नदीचे प्रदुषण होते. हीच बाब टाळण्यासाठी आणि निर्माल्याचे योग्यप्रकारे संकलन करुन त्याची पर्यावरण पुरक विल्हेवाट लावण्याठी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी पुण्यात आदर्शवत उपक्रम राबवला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यात गणेशभक्तांकडून निर्माल्यांचे संकलन करुन त्याची शिस्तबद्धरित्या विभागणी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात निर्माल्य पाण्यात मिसळल्यास पाणी प्रदूषित होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे या निर्माल्यापासून खतनिर्मिती करणे किंवा इतर काही उपायांद्वारे पर्यावरण पुरक विल्हेवाट लावणे, यासाठी डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांनी हे निर्माल्य संकलनाचे व्रत हाती घेतले होते आणि हजारो किलो निर्माल्य संकलन करत, ते यशस्वी देखील केले. ( Dr Shri Nanasaheb Dharmadhikari Pratishthan Nirmalya Collection Pune )
अधिक वाचा –
लोणावळा शहरात विसर्जन मिरवणूकीनंतर सालाबादप्रमाणे शिवसेनेकडून महाप्रसादाचे वाटप
मोठी बातमी! जगभरातील हिंदू धर्मियांवर शोककळा, सर्वात मोठ्या धर्मगुरुचे निधन