गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! असे म्हणत लोणावळाकरांनी मोठ्या जल्लोषात लाडक्या बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला. तब्बल सहा ते सात तास विसर्जन मिरवणूक सुरु होती. अनंत चतुर्दशी निमित्ताने लोणावळा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीतील गणेशभक्त, गणेशोत्सव मंडळ, ढोल लेझीम पथक व सर्व नागरिकांना शिवसेना ( Shiv Sena ) लोणावळा ( Lonavla ) शहराच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही महाप्रसादाचे ( Maha Prasad By Shiv Sena ) वाटप करण्यात आले.
तसेच यावेळी लोणावळा शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ढोल लेझीम पथकांचे स्वागत करून सन्मानित करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या महाप्रसादाचे वाटप शुभारंभ मावळ विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख भारत ठाकुर, महिला आघाडी सहसंपर्क संघटिका माजी नगरसेविका श्रीमती शादान चौधरी, युवासेना पुणे जिल्हा अधिकारी अनिकेत घुले, तालुका संघटक सुरेश गायकवाड, उपतालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, उपतालुकाप्रमुख अनिल ओव्हाळ, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक आदींच्या हस्ते करण्यात आले.
हा महाप्रसाद वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोणावळा शहर शिवसेनेच्या सर्व आजी माजी पदाधिकारी नगरसेवक शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले. ( Maha Prasad By Shiv Sena Lonavla After Immersion Procession Of Ganpati )
अधिक वाचा –
लोणावळा गणेश विसर्जन मिरवणूक : गणेशभक्तांसोबत आमदार शेळकेंनी धरला ठेका, जल्लोषाचा Video व्हायरल
सुरेखा जाधवांच्या हस्ते लोणावळ्यात लहान मुलांना खेळणी आणि खाऊचे वाटप तर महिलावर्गाला साडी भेट