व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘एमएसआयडीसी’कडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाचा मसुदा सादर, आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कॅबिनेट मंजुरीची जबाबदारी माझी : आमदार सुनिल शेळके

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 23, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : प्रस्तावित तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी च्या कामाचा मसुदा एमएसआयडीसीकडून महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांमार्फत मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाविषयी मावळचे आमदार सुनील शेळके, खेडचे आमदार बाबाजी काळे आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.२२) महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे (एमएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांची एमएसआयडीसीच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ( Draft of work of Talegaon-Chakan-Shikrapur highway submitted by MSIDC )

बैठकीत एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित म्हणाले की, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचे प्रस्तावित कामासाठी राज्य शासनाने वस्तू व सेवा कर,मुद्रांक शुल्क तसेच गौण खनिज वापराबाबत सवलत द्यावी यासांदर्भात एमएसआयडीसीकडून गेल्या १ जानेवारी रोजी प्रारुप मसुदा कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याला महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर त्वरित भूसंपादन आणि निविदा कार्यवाही वेगाने सुरु करण्यात येईल. सदर कामाबाबत कृती समितीचे पदाधिकारी करीत असलेल्या पाठपुराव्याचे दीक्षित यांनी तोंडभरुन कौतुक केले.

  • मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले की, आगामी कॅबिनेटच्या बैठकीत तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाच्या मसुद्याला तत्काळ मंजुरी द्यावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे. कॅबिनेट मंजुरीची जबाबदारी माझी आहे, असे शेळके यांनी सांगितले.

सध्या होत असलेल्या वाहतूक कोंडीवर तत्काळ उपाययोजना करण्याबाबत आमदार बाबाजी काळे यांनी दीक्षित यांना विचारले असता, ऑन रेकॉर्ड हा रस्ता भारतीय राजमार्ग प्राधिकरणकडेच आहे. कॅबिनेट मंजुरीनंतर निधी उपलब्ध होताच वाहतूक कोंडीवर उपायोजना केल्या जातील, असे दीक्षित यांनी सांगितले. तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे, उपाध्यक्ष दिलीप डोळस, सचिव अमित प्रभावळकर, सदस्य संजय चव्हाण, प्रमोद दाभाडे आदी मान्यवर बैठकीस उपस्थित होते.

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि प्रस्तावित पुणे-संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग-७५३ ला जोडणारा ५३ किमीचा तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग हा पुणे शहराकरिता बाह्यवळण मार्ग म्हणून उपयोगी पडणारा आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या असल्याने वाहनांना बराच काळ लागतो. सदर दुपदरी मार्गाचे चार पदरी उन्नत मार्गात बांधकाम करण्यासह आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने केले आहे.

त्यासाठी आवश्यक एकूण रुपये साडेसहा हजार कोटीचा निधी पथकर गुंतवणुकीच्याद्वारे ई.पी.सी. तत्त्वावर विकसित करणेबाबत किंवा अथवा बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बी.ओ.टी,) तत्त्वावर आवश्यक निविदा कार्यवाही उद्योजक म्हणून एमएसआयडीसी मार्फत करण्यात यावी. प्रस्तावित तळेगाव-चाकण-शिक्रापूर चार पदरी उन्नत मार्ग आणि सध्याच्या अस्तित्वातील दोन पदरी रस्त्याचे उड्डाणपूल बांधकामाचे उद्योजक म्हणून एमएसआयडीसी मार्फत पथकर प्रणालीद्वारे करण्यास मंजुरी देणे.

भारतीय राजमार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनात तात्काळ सामंजस्य करार करुन ३० वर्षांसाठी सवलत कारनामा करुन सर्वसामावेशक कार्यकारी समिती गठीत करावी. केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या पथकर धोरणांनुसार एमएसआयडीसीमार्फत पथकर लावून या रस्त्याची सुधारणा करण्यास मान्यता द्यावी. आर्थिकदृष्ट्या सुसाध्य करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने वस्तू व सेवा कर,मुद्रांक शुल्क तसेच गौण खनिज वापराबाबत सवलत द्यावी आणि सदर कामासाठी ४१ हेक्टर भूसंपादनासाठी १० कोटीं प्रति हेक्टर असा एकूण ४१० कोटींचा निधी उपलब्ध करुन दयावा.

सदर मार्ग हरित मार्ग म्हणून विकसित करून त्याद्वारे कार्बन क्रेडिट प्राप्त करुन आर्थिक सुधारणा सुलभता एमएसआयडीसीने तपासावी. या रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरु होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने वेळोवेळी आवश्यक ती पावले उचलावीत आदी बाबी या मसुद्यात मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– येत्या तीन ते चार महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकेच्या निवडणुका होणार !
– बाजार समितीवर कुणाची सत्ता राहणार ? मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची नव्याने निवड होणार
– राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले ! पक्षाची कोअर कमिटी जाहीर , आमदार सुनील शेळके यांचा समावेश । Maval News 


Previous Post

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस वाहने घेऊन जाण्याचे आवाहन । Maval News

Next Post

पुणे जिल्ह्यातील 305 प्राथमिक शाळा व 108 आरोग्य केंद्र ‘स्मार्ट’ करण्याचे नियोजन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून योजनांचा आढावा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune Collector Jitendra Doody

पुणे जिल्ह्यातील 305 प्राथमिक शाळा व 108 आरोग्य केंद्र 'स्मार्ट' करण्याचे नियोजन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून योजनांचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Guidance from Shirota Forest Department to students of Nane Nanoli and Sai villages Maval

महत्वाची बातमी ! शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली जारी ; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

March 13, 2026
LPG-Gas

पुणे जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे नागरिकांना आवाहन

March 13, 2026
government sudden increase in gas cylinder prices is unfair Maval Taluka Congress statement

सरकारने गॅस सिलिंडरची अचानक केलेली दरवाढ अन्यायकारक ; मावळ तालुका काँग्रेसचे निवदेन

March 12, 2026
MLA Sunil Shelke attention in session regarding issues in Dehuroad Cantonment area

रेडझोनचा प्रश्न, शिक्षण – आरोग्य – पाण्याची समस्या ; देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळके यांची अधिवेशनात लक्षवेधी

March 12, 2026
Agriculture Minister Dattatreya Bharane

खत विक्रीत अनियमितता आढळल्यास दोषी विक्रेत्यांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेणार – कृषी मंत्री

March 12, 2026
Katkari community gets benefit of Rs 2 lakh 39 thousand from government for building house with toilet

शौचालय सहीत घरकुल बांधणीसाठी कातकरी समाजाला सरकारकडून मिळतो २ लाख ३९ हजार रुपयांचा लाभ

March 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.