Dainik Maval News : गुलाबी थंडी अन् सुट्ट्यांची रेलचेल असल्याने डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक मावळ तालुक्यात येत असतात. यातही विशेषतः पवना धरण परिसरात वीकेंडला येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. पवना लेक परिसरात टेन्ट कॅम्पिंग अन् गडकिल्ले परिसरात पर्यटनासाठी शनिवार, रविवारी खासकरून पर्यटक येतात अन् याच काळात अरुंद रस्ता असल्याने दुधीवरे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. याचा त्रास स्थानिकांसह पर्यटकांनाही होत आहे.
मुळात दुधीवरे खिंड ही डोंगराची एक चढण चढल्यानंतर माथ्यावर आहे, अशावेळी लोणावळा आणि पवनानगर दोन्ही बाजूने दुधीवरे खिंड ओलांडण्यासाठी वाहन चालकांना डोंगर चढावा लागतो. हा रस्ता अरुंद असून साईडपट्टी खचलेला आहे. एकेरी मार्ग असलेला हा रस्ता काही ठिकाणी खड्डेमय आहे. यामुळे शनिवार, रविवार जेव्हा पर्यटकांची संख्या अधिक असते आणि वाहनांची संख्या या मार्गावर वाढते तेव्हा इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
एकेरी मार्गामुळे आणि रस्ता नवीन असल्याने पर्यटकांना येथे वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते. त्यात चढाला वाहनांमागून वाहन नेताना नवख्या वाहन चालकाला गाडीवर नियंत्रण ठेवणे जमत नाही. यातून वाहने थांबणे, बंद पडणे, एकमेकांना धक्का लागणे अशा गोष्टी होतात. या गोंधळाची वाहतूक कोंडीत भर पडते.
पवना धरण, लोणावळा, लोहगड, विसापूर, भाजे लेणी या भागांना जोडणारा हा प्रमुख रस्ता असून याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. तसेच खिंड भागात रस्ता अधिक रुंद होऊन तिथे वाहतूक व्यवस्थापन होणे आवश्यक आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण

