Dainik Maval News : कामशेत येथे पाणीपुरवठा विभागाचा विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) चोरण्याचा प्रयत्न, तेथील जागृत कर्मचाऱ्यांनी हाणून पाडला आहे.
कामशेत येथील इंदिरा आवास योजनेमध्ये पाणी पुरवठा योजनेसाठी जो ट्रान्सफर बसविण्यात आला होता, तो मंगळवारी (दि.11) रात्री चोरण्याचा प्रयत्न काही चोरट्यांनी केला. परंतू तिथे असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.
- नागेश दौंडकर, नागेश कटारिया, अजय म्हसे इत्यादी कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचा टान्सफॉर्मर चोर चोरीचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आल्याने त्यांनी त्या सर्व चोरांना पळवून लावले व ट्राम्सफॉर्मर चोरी होण्यापासून वाचवला.
पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना पाहताच चोरटे ट्रान्सफॉर्मर टाकून पळून गेले, त्यामुळे ट्रान्सफॉर्मर खाली टाकल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यास वेळ लागत असल्याने पाणी पुरवठा होण्यास विलंब होईल, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांकडून माहिती प्राप्त झाली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ