Dainik Maval News : बाल दिनानिमित्त मावळ विधानसभा मतदार संघाचे सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी बालकांना चॉकलेट वाटत बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप शिका आणि पुढे जा असा संदेश दिला.
बापूसाहेब भेगडे हे मावळात प्रचार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गावागावातील छोट्या मुलांना चॉकलेट, बिस्कीट वाटप करीत मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना म्हणाले, की बालदिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांचा विकास, शिक्षण आणि हक्क याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे, हा आहे.
ही छोटी छोटी मुलं भारताचे उज्ज्वल भविष्य आहे. म्हणून तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, की ‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा.’ लहानपणाचे दिवस पुन्हा येत नाहीत. खेळण्या- बागडण्याचा मनसोक्त आनंद घ्या. चांगलं वाचन करा. आता अभ्यास केला, तर भविष्यात आनंदी, सुखी जीवन जगू शकाल, असा सल्लाही त्यांनी छोट्या मुलांना दिला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘केवळ मला बदनाम करून तुम्ही ही निवडणूक जिंकू शकत नाही’ : सुनिल शेळके यांचा विरोधकांना टोला
– ‘मी तालुक्यासाठी 4,158 कोटींचा विकासनिधी आणला, तुम्ही निदान 8,000 कोटींचा शब्द तरी द्या’ – आमदार शेळके
– मावळची संस्कृती बिघडवून टाकली ; बापूसाहेब भेगडे यांची आमदार सुनिल शेळकेंवर तीव्र शब्दात टीका । Bapu Bhegade