व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, February 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोरया प्रतिष्ठानकडून वडगावात पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट स्पर्धा, पहिलं बक्षीस 7 हजार रुपये, वाचा स्पर्धेचे नियम । Vadgaon Maval

गणपती बाप्पा हे हिंदूंचं आराध्य दैवत आणि गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा एक हळवा कोपरा.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 22, 2023
in लोकल, शहर
Eco-Friendly-Ganesha

Photo Courtesy : Yashwant Shinde


गणपती बाप्पा हे हिंदूंचं आराध्य दैवत आणि गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा एक हळवा कोपरा. अत्यंत श्रद्धेने आणि मोठ्या भक्तिभावाने हा सण महाराष्ट्राभर अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बरोबरीने वडगाव मावळ शहरांमध्ये घरोघरी जवळपास 2 ते 3 हजार घरगुती गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यांच्या आगमनापूर्वी घरात लगबग सुरू झालेली असते. प्रत्येकजण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो. मग ते दिव्यांची आरस असो वा फुलांची तोरण, थर्माकोलचे आकर्षण मखर असो वा गणेशाची सुंदर मूर्ती असो!

घरगुती गणपतींना होणारी ही सजावट लक्षात घेता मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे आणि वडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या संकल्पनेतून यावर्षी पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2023 हा धार्मिक उपक्रम हाती घेतला आहे. या स्पर्धेत सर्वांना सहभागी होता येईल. तसेच प्रत्येक कॅटेगरी मधून 3 नंबर काढण्यात येणार आहेत. ( Eco Friendly Home Ganesha Decoration Competition 2023 in Vadgaon Maval City )

स्पर्धेचे नियम व अटी
1) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नसेल.
2) मूर्तीची सुबकता, सजावट महत्वाची आहे.
3) सजावटीतून सामाजिक संदेश दिलेला असावा.
4) आराससाठी झालेला खर्च व वेळ याचा तपशील.
5) आरस करत असतानाचे फोटो अथवा व्हिडीओ असणे आवश्यक आहे.
6) इकोफ्रेंडली उपक्रम
7) केलेल्या आरासाबद्दल घरातील सदस्यांना असलेली माहिती.
8) गणेश उत्सवाबद्दल माहिती असावी प्रश्नांची उत्तरे देणे.
9) पर्यावरणपूरक सजावट असावी.
10) थर्माकोलचा वापर टाळावा.
11) परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
12) सहभाग घेताना कॅटेगरी निवडणे आवश्यक.
१३) प्रत्येक कॅटेगरी मधून तीन नंबर काढण्यात येतील.
14) सदर स्पर्धेचे परीक्षण मंगळवार दि 19 सप्टेंबर ते शनिवार दि 23 सप्टेंबर यादरम्यान सायंकाळी 4 ते 9 या वेळेत परीक्षक आपल्या घरी प्रत्यक्ष भेट देण्यास येणार आहेत.

स्पर्धा विषयक कॅटेगरी
1) सामाजिक 2) वैज्ञानिक 3) नैसर्गिक 4) ऐतिहासिक 5) काल्पनिक 6) इकोफ्रेंडली
बक्षीसांचे स्वरूप
प्रथम क्रमांक – 7000 /-
द्वितीय क्रमांक 5000 /-
तृतीय क्रमांक 3000 /-
कॅटेगरी प्रमाणे एकूण अठरा विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस 90,000 /- रुपये
सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र
स्पर्धा नावनोंदणी गुरुवार दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी पर्यंतच असणार आहे.
अधिक माहितीसाठी : 8983878722 / 9822838823

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– हिंजवडी, माण, मारूंजीसह ‘या’ 7 गावांचा लवकरच महापालिकेत समावेश होणार, खासदार बारणेंची माहिती; मुख्यमंत्र्यांचेही आश्वासन
– चैतन्य इंटरनॅशनल स्कूल इंदुरी येथील विद्यार्थ्यांनी लोकनृत्यातून घडवले वैभवशाली भारतीय संस्कृतीचे दर्शन
– वडगाव शहरात ‘ना नफा – ना तोटा’ तत्वावर वॉटर एटीएमची सुरुवात; आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन


Previous Post

सुदवडी गावातील साई-सृष्टी नगरात अंतर्गत रस्त्याची दुर्दशा, स्थानिकांनी स्वखर्चाने केली तात्पुरती सुधारणा

Next Post

आधी निर्यातशुल्कात 40 टक्के वाढ, त्यानंतर कांद्याबाबत केंद्र सरकारचा दुसरा मोठा निर्णय, लगेच वाचा…

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Onion-Issue

आधी निर्यातशुल्कात 40 टक्के वाढ, त्यानंतर कांद्याबाबत केंद्र सरकारचा दुसरा मोठा निर्णय, लगेच वाचा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.