मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील चावसर केंद्रातील जिल्हा परिषदेची शेवटची शाळा मोरवे ही असून या शाळेला शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर कुलकर्णी यांनी नुकतीच भेट दिली.
सदर भेटीमध्ये शालेय परिसर, पिण्याच्या पाण्याची सोय, मुलामुलींचे शौचालय, खेळांचे मैदान, क्रीडा साहित्य, आधार अपडेट, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, तारखेप्रमाणे पाढे पाठांतर, कविता वाचन,श्रृतलेखन,शालेय पोषण आहार, विविध योजना व उपक्रम यांचा आढावा घेतला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ग्रामीण भागातील शाळेची गुणवत्ता व शैक्षणिक वातावरण बघून आनंद व्यक्त केला तर शिक्षकांचे कौतुक सुध्दा केले. यावेळी मोरवे शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांनी पुस्तक भेट देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी शिक्षक शरद शिंदे, अन्नपूर्णा पाखरे, बायडाबाई वांजळे उपस्थित होते. तर यावेळी चावसर व शिळिंब केंद्रातील इतरही शाळांची शैक्षणिक तपासणी करण्यात आली.
अधिक वाचा –
– मोरवे गावातील महिलांकरिता मसाला बनवण्याचे कौशल्ये प्रशिक्षण कार्यक्रम
– ‘हॅण्ड इन हॅण्ड’ आणि ‘फिंचम इंडिया’ मार्फत महागावमध्ये शासकीय सामजिक सुरक्षा योजना जनजागृती कार्यक्रम
– शिळींब गावात शासकीय योजनांबद्दल जनजागृती कार्यक्रम; अनेक नागरिकांना ई-श्रम, आरोग्य कार्ड आदी योजनांचा लाभ