मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र चॅम्पियन, मावळ केसरी पैलवान खंडू बबन वाळूंज यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन आणि मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे माजी अध्यक्ष पैलवान चंद्रकांत सातकर आणि ऑलिम्पियन कुस्तीगीर व कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान मारुती आडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. ( Wrestler Khandu Valanj Elected As President Of Maval Taluka Kustigir Sangh )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुका कुस्तीगीर संघाची विषेश सभा पै. चंद्रकांत सातकर यांच्या अध्यक्षतेखाली कान्हे फाटा येथील तनिष्का हॉटेल येथे घेण्यात आली. यावेळी कुस्तीगीर संघाचे विद्यमान अध्यक्ष ऑलिंपिकवीर पै. मारुती आडकर यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी पै. खंडू वाळूंज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन पै. चंद्रकांत सातकर, ऑलिम्पियन कुस्तीगीर आणि शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित पै. मारुती आडकर, राष्ट्रीय कुस्तीगीर व कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संभाजी राक्षे, राष्ट्रीय कुस्तीगीर व कुस्तीगीर संघाचे सचिव पै. बंडू येवले, महाराष्ट्र चॅम्पियन पै. तानाजी कारके, पै. मनोज उर्फ मनोहर येवले, पै. धोंडिबा आडकर, पै. सुरेश उर्फ मामू आगळमे, पै. शिवाजी येवले, पै. चंद्रकांत तांबोळी यावेळी उपस्थित होते.
‘मावळ तालुक्यातील नवोदित कुस्तीगीरांच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन वेगवेगळे क्रीडात्मक धोरण आणि संकल्पना राबवून कुस्ती व कुस्तीगीरांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल,’ अशी ग्वाही यावेळी खंडू वाळूंज यांनी दिली.
अधिक वाचा –
– मावळ राष्ट्रवादीकडून थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच आणि नवनिर्वाचित ग्रामसदस्यांचा सत्कार । Vadgaon Maval
– रेल्वे मार्गाच्या कामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत माय-लेकाचा मृत्यू, खासदार श्रीरंग बारणेंनी घेतली कुटुंबीयांची भेट