श्रीक्षेत्र देहू येथील अभंग प्रतिष्ठान यांच्या प्रयत्नातून कल्याणी टेक्नोफोर्ज यांच्या सीएसआर फंडातून देहू गावातील जिल्हा परिषद शाळेला 7 लाख रुपयाचे शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. बुधवार (19 जानेवारी) रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला.
कल्याणी टेक्नोफोर्ज कंपनीचे प्लांट हेड आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देहुचे माजी विद्यार्थी महेश लक्ष्मण गाडे यांच्या विशेष सहकार्याने आणि अभंग प्रतिष्ठानचे मा उपाध्यक्ष सुरेश लक्ष्मण गाडे, नगरसेवक प्रविण रामदास काळोखे यांच्या पाठपुराव्यातून हे साहित्य देण्यात आले. कल्याणी टेक्नोफोर्ज कंपनीच्या सीएसआर फंडातून 120 बेंच, 42 इंची 5 स्मार्ट टीव्ही असे एकूण 7 लाख रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य शाळेला भेट देण्यात आले. ( Educational Materials Gift To Zilla Parishad School of Dehu Village From CSR Fund Of Kalyani Technoforge Company )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शैक्षणिक साहित्य शाळेला भेट देण्याच्या कार्यक्रम प्रसंगी कल्याणी टेक्नो फोर्ज कंपनीचे प्लांट हेड महेश गाडे, विशाल सरोदे, राहुल सावंत, मुरलीधरण पिल्ले, सुशील पाटील, पूर्णचंद्र अर्या, संतोष गडमोडे, स्वप्निल मझिरे, मोनिका काळोखे, नवीन काळोखे, पालक संघ आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन काळोखे, अभंग प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष वसंत भसे, सुरेश गाडे, नारायण तथा तात्यासाहेब पाचपिंड, सचिन काळोखे, विजय मोरे, अजिंक्य साकोरे, सचिन कुंभार, सुभाष कंद, बिभीषण खोसे, प्रीतम कंद आदी मान्यवर पदाधिकारी आणि शाळेचे मुख्याध्यापक जठर सर, सर्व शिक्षक वृंद, अभंग प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी हगवणे सर, राहुल सावंत आणि महेश गाडे यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व शिक्षकांनी आणि पालक प्रतिनिधी यांनी कंपनीच्या या अनमोल सहकार्याबद्दल कंपनीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि एक चांगले माध्यम म्हणून अतिशय सेवाभावनेने कार्यरत असणाऱ्या शाळेसाठी वेळोवेळी अनमोल सहकार्य करणाऱ्या अभंग प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे विशेष धन्यवाद व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विकास कंद यांनी केले. तर आभार प्रदर्शन नरवडे सर यांनी केले. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.
अधिक वाचा –
– दुधिवरे गावात शासकीय योजनांबाबत जनजागृती कार्यक्रम; ग्रामस्थांनी ई-श्रम कार्ड, आभा कार्ड योजनांचा घेतला लाभ
– मोठी बातमी! तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूकांसह कसबा पेठ, पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकांचीही घोषणा
– मोठी बातमी! गौतम चाबुकस्वार यांची शिवसेना ठाकरे गटाच्या मावळ जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती