Dainik Maval News : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकविरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला गुरुवारी (दि.3 ऑक्टोबर) सुरुवात झाली. घटाच्या पहिल्या माळेलाच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची तोबा गर्दी झाली होती.
मावळचे आमदार सुनिल शेळके, त्यांच्या पत्नी सारिका सुनिल शेळके, एकविरा देवस्थानचे अध्यक्ष दिपक हुलावळे, त्यांच्य पत्नी दिपाली हुलावळे यांच्या हस्ते देवीचा अभिषेक आणि आरती पार पडली. यानंतर विश्वस्त मंडळ, गुरव प्रतिनिधी व पुजारी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देवीला घट बसवण्यात आला.
देवीच्या नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी श्री एकविरा देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. आई जोगेश्वरी देवीला सोन्याचा मुखवटा बनविन्यात आला आहे. तो देखील बसवण्यात आला. चौघडा जवळ मोठा स्क्रीन टीव्ही देखील लावण्यात आल्या आहेत. तसेच मंदिराच्या आतील परिसर व मंदिराचा बाहेरील परिसर फुलांनी आकर्षक रित्या सजवण्यात आलेला आहे.
मंदिर पायथा परिसरामध्ये लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त तैणात आहे. भाविकांनी देखील गडावर वाहने घेऊन जाण्याचा आग्रह न धरता या वाहन तळांवर आपली वाहने उभी करत पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कामशेत खिंडीत झालेल्या भीषण ट्रेलर अपघातात एकाचा जागीच होरपळून मृत्यू – पाहा Video
– ग्रामीण भागातील विद्यार्थीनींची पायपीट थांबणार ! पवना विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप
– अजित पवारांच्या हस्ते शुक्रवारी मावळात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण, पाहा संपूर्ण कार्यक्रमपत्रिका