मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र.१७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश पसरविले जात असल्याचे निदर्शनास आले असून अशा संदेशांपासून सावध रहावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.
मतदार यादीत नाव नसतानाही नावे यादीतून वगळलेली असलेल्या नागरिकांनी मतदान केंद्रावर जावून अर्ज क्र.१७ भरावा. असे नागरिक मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करू शकणार असल्याने ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांनी मतदान केंद्रावर जावून त्वरीत पुढील प्रक्रीया करावी, असा संदेश भ्रमणध्वनीवरून देण्यात येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, अशी चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. ( Election administration urged to be wary of misleading messages in connection with polling )
अधिक वाचा –
– मतदान करताना फोटो किंवा व्हिडिओ काढल्यास होणार कारवाई ! मतदारांनी थिल्लरपणा टाळून मतदान करण्याचे आवाहन
– ‘कामच करून टाकेन…’, मावळमध्ये विरोधी उमेदवाराचा आतून प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादांचा सज्जड दम !
– अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य ! Pune News