Dainik Maval News : मावळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून सर्वच इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. गावागावांत, वाड्या–वस्त्यांवर जाऊन मतदारांशी संवाद साधत, आपापली भूमिका मांडताना अनेक उमेदवार दिसत आहेत. नागरिकांच्या भेटीगाठी, प्रचारसभा आणि घराघरांतून संवाद साधण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडत आहे.
याच पार्श्वभूमीवर वराळे–इंदोरी गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख इच्छुक उमेदवार मेघाताई भागवत यांनी आंबी गावात महिलांच्या गाठीभेटींचा दौरा आयोजित केला. त्यांनी विविध गावांमधील माता-भगिनींशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि स्थानिक प्रश्न जाणून घेतले. यावेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मेघाताई भागवत यांच्या कार्यावर आपला विश्वास व्यक्त केला.
गाठीभेटींच्या दरम्यान महिलांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी आपल्या भावना मांडताना, “मेघाताई आमच्यासारख्या सर्वसामान्य महिलांसाठी काम करणाऱ्या खऱ्या लोकनेत्या आहेत,” अशा शब्दांत समर्थन व्यक्त केले. महिलांनी एकमुखाने सांगितले की, “आम्ही सर्व मेघाताई भागवत यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.”
या दौऱ्यात मेघाताई भागवत यांनी सांगितले की, “महिलांच्या विकासाशिवाय समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. महिला सक्षमीकरणासाठी ठोस उपक्रम राबवणे हे माझे ध्येय आहे.” त्यांच्या या संवाद दौऱ्यामुळे गटातील राजकीय समीकरणे आणखी रंगतदार बनली आहेत.
मावळ तालुक्यातील या आगामी निवडणुकीत महिलांचा वाढता सहभाग आणि उमेदवारांना मिळणारा लोकसंपर्क पाहता, पुढील काही दिवसांत निवडणुकीचे वातावरण अधिकच तापणार हे निश्चित आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायत निवडणूक : नागरिकांसह सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – सहा. निवडणूक निर्णय अधिकारी
– रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन – कुठे अर्ज करावा, कोणती कागदपत्रे हवी? वाचा सविस्तर
– ठरलं तर ! वडगाव नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर लढणार ; १७ नगरसेवक आणि १ नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार

