Dainik Maval News : मावळ तालुक्यातील प्रमुख कान्हे – नायगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पुजा गोरख चोपडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळत्या उपसरपंच रोहणी चोपडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच विजय वामन सातकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामसेवक संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक घेण्यात आली.
विहित वेळेत पुजा गोरख चोपडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संतोष शिंदे यांनी पुजा चोपडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी सरंपच विजय वामन सातकर, माजी उपसरपंच रोहनी चोपडे, आरिफ मुलाणी, सुजाता चोपडे, सोपान धिंदळे, गिरिष सातकर, किशोर सातकर, महेश सातकर, आशा सातकर, रुपाली कुटे, संदीप ओव्हाळ, बाबाजी चोपडे, सोनाली सातकर, अश्विनी शिंदे, मनीषा ओव्हाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अबब ! पुणे जिल्ह्यात 3 हजार 677 नागरिकांकडे शस्त्रांचा परवाना ; पावणेचार हजार शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या – मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
– मावळच्या जागेबाबत अधिकृत निर्णय समोर आल्यानंतर आम्ही आमची भुमिका जाहीर करू – रविंद्र भेगडे