व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळच्या जागेबाबत अधिकृत निर्णय समोर आल्यानंतर आम्ही आमची भुमिका जाहीर करू – रविंद्र भेगडे

'2 ऑगस्टच्या मेळाव्यात जो निर्णय झालाय, त्यावर आम्ही ठाम' असे म्हणत रविंद्र भेगडे यांच्याकडून मावळ विधानसभा लढविण्याचे ठोस संकेत

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 22, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
BJP Maval Ravindra Bhegade

Photo Courtesy : FB / Ravindra Bhegade


Dainik Maval News : भारतीय जनता पार्टी पक्षाने मावळच्या उमेदवारीबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. हा निर्णय जाहीर झाल्यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे भाजपाचे मावळ विधानसबा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी सांगितले. सोमवारी (दि.21) रात्री तातडीने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत भेगडे यांनी हे वक्तव्य केले.

पत्रकार परिषदेला रविंद्र भेगडे यांसह माजी तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, माजी उपसभापती शांताराम कदम, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार हेही उपस्थित होते. रविंद्र भेगडे हे मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीच्या रिंगणात असतील का? याबाबत मावळच्या जनतेत आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळेच सोमवारी पत्रकार परिषदेत रविंद्र भेगडे काय बोलणार, नेमकी कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. परंतु, कोणतीही मोठी घोषणा करण्याचे टाळून रविंद्र भेगडे यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केले.

पक्षाने दिलेली समन्वयक पदाची जबाबदारी नाकारली
रविंद्र भेगडे यांनी सोमवारी तळेगाव येथील पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच महत्वाची माहिती माध्यमांना दिली. रविंद्र भेगडे यांना पक्षाने विधानसभा निवडणूकीसाठी ‘मावळ विधानसभा समन्वयक’ ह्या पदाची जबाबदारी देऊ केली होती, ती जबाबदारी भेगडे यांनी स्विकारली नाही. रवी भेगडे यांनी पक्षाने देऊ केलेले हे पद आणि जबाबदारी नाकारली असून पक्षाने आता अशा पद, जबाबदाऱ्यांऐवजी मी मावळची उमेदवारी मागत आहे, ती उमेदवारी द्यावी, असे स्पष्टपणे सांगितले.

परिवर्तन घडवायचं आहे…
रविंद्र भेगडे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात मावळात सुरू असलेली दडपशाही रोखण्यासाठी भाजपाने ही जागा स्वतःकडे घ्यावी आणि भाजपाचा उमेदवार म्हणून मला संधी द्यावी. पक्षाने मला मावळ विधानसभा समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे, पण ती मला मान्य नाही. त्या ऐवजी पक्षाने मला विधानसभेची उमेदवारी द्यावी. मावळात आम्हाला आता परिवर्तन घडवायचे आहे. मावळात सर्वसामान्यांना होणारा त्रास, अडवणूक वाचविण्यासाठी ही निवडणूक लढवणे महत्त्वाचे आहे, असे भेगडे म्हणाले.

मावळ तालुक्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पवना धरणग्रस्तांचे प्रश्न, पवना बंद जलवाहिनी, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न, दहशत-दादागिरी पासून मावळला मुक्त करायचे आहे, अशा अनेक बाबींवर त्यांनी आपले मत पत्रकार परिषदेत मांडले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कामशेत आणि वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटलांसोबत प्रशासनाची बैठक
– भाजपाने दिलेली ‘ती’ जबाबदारी रविंद्र भेगडे यांनी नाकारली ; पक्षाने मावळमधून उमेदवारी द्यावी यावर ठाम ! Maval Vidhan Sabha
– मोठी बातमी ! अजित पवारांकडून यादी जाहीर, आमदार सुनिल शेळके यांचे नाव गायब, चर्चांना उधाण, पाहा यादी…


dainik maval jahirat

Previous Post

“मावळसाठी 4 हजार 158 कोटींचा निधी, महायुतीचाच उमेदवार विजयी होणार, खोटे-नाटे सांगून विष पेरू नका”

Next Post

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या – मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chief Minister Eknath Shinde

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या - मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.