Dainik Maval News : मावळ तालुक्यातील उकसान ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सीताबाई मधुकर शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. माजी सरपंच आशा मोरमारे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून निलेश अवसरमोल तलाठी धनवडे व ग्रामसेविका अश्विनी झेंडे यांनी काम पाहिले. सरपंचपदासाठी सीताबाई शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची सरपंच म्हणून निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित सरपंचांचा गावच्या नागरिकांकडून सत्कार करण्यात आला.
- यावेळी उपसरपंच अमोल शिंदे, माजी सरपंच आशाताई मोरमारे,सारिका कोंढरे,शामल इंगवले,आशाताई बांदल, पोलीस पाटील सुषमाताई शिंदे, सामाजिक कार्यकर्ते बबनराव कोंढरे,नथुभाऊ इंगवले,माजी उपसरपंच बाळासाहेब शिंदे, माजी उपसरपंच प्रभाकर शिंदे आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित सरपंच शिंदे यांनी जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने काम करणार असल्याचा ग्रामस्थांना विश्वास दिला. ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंचांची भव्य मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News