राज्यातील ग्रामपंचायत आणि रिक्त असणाऱ्या सरपंचपदाच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 18 मे रोजी मतदान होणार आहे. यात मावळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी 18 मे रोजी निवडणूक होणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यातील वराळे (अनुसूचित जाती स्त्री), माळवाडी (सर्वसाधारण), सावळा (अनुसूचित जमाती स्त्री), आढले खुर्द (सर्वसाधारण), शिवणे (सर्वसाधारण), वारू (नागरिकांचा मागास प्रवर्ग), कोथुर्णे (सर्वसाधारण), धामणे (अनुसूचित जाती स्त्री), चिखलसे (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री) या 9 ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. ( Election on May 18 for vacancies in 9 gram panchayats of Maval taluka )
संपूर्ण निवडणूक कार्यक्रम :
- 25 एप्रिल ते 2 मे – उमेदवारी अर्ज दाखल करणे
- 3 मे – छाननी
- 8 मे – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
- 18 मे – मतदान
- 19 मे मतमोजणी
दरम्यान, दिवड येथील नागरिकांचा मागास प्रवर्गाची जागा रिक्त आहे. परंतू या ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत 20 जून रोजी संपत आहे. सार्वत्रिक निवडणुकीला सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिला असल्याने तिथे पोटनिवडणूक होणार नाही.
राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे.
अधिक वाचा –
– जवणच्या घाटात ब्रेक फेल लालपरीचा थरार! बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
– मावळ तालुक्यातील ओझर्डे, कांब्रे आणि साते गावातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठी मदत