Dainik Maval News : एका उमेदवाराच्या निधनामुळे स्थगित करण्यात आलेली पवना कृषक सेवा सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात आली आहे. येत्या पाच एप्रिल रोजी निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. के. निखारे यांनी दिली.
- पवना कृषक सेवा सहकारी संस्थेची निवडणूक 23 फेब्रुवारी रोजी होणार होती. अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर संस्थेच्या एकूण 13 जागांसाठी 32 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात सर्वसाधारण खातेदार, कर्जदार प्रतिनिधींच्या आठ जागांसाठी सर्वाधिक 21, महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी 4, अनुसूचित जाती व जमातीच्या एका जागेसाठी 2, मागास वर्ग प्रतिनिधीच्या एका जागेसाठी 3, भटक्या जाती जमाती/ विशेष मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी 2 उमेदवारांचा समावेश होता.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटपही करण्यात आले होते. परंतु, सर्वसाधारण खातेदार मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या रमेश गणपत माळवदकर या उमेदवाराचे आकस्मित निधन झाले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी निखारे यांनी निवडणूक प्रक्रियेतील तरतुदीनुसार ही निवडणूक स्थगित केली होती. आता जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणुकीची नव्याने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
- पाच एप्रिल रोजी निवडणूक होणार असून, पाच मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. सहा मार्चला छाननी तर चोवीस मार्चला चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान, निवडणुकीची प्रक्रिया नव्याने सुरु झाली असली तरी निवडणुकीसाठी यापूर्वी अर्ज दाखल केलेल्या इतर सर्व उमेदवारांचे अर्ज कायम राहणार आहेत. त्यांना नव्याने अर्ज दाखल करण्याची आवऱ्यकता नाही.
ज्यांनी या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याची नोटीस दिली असेल, त्यांना पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. तसेच सध्या जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांना आता नवीन प्रक्रियेत अर्ज मागे घेता येणार नाहीत, अशी माहिती निखारे यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक