पुण्याजवळील रांजणगाव येथे राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ (EMC) प्रकल्पासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यातील 62 कोटी 39 लाख रुपये एमआयडीसीकडे वर्ग केले आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.
केंद्र सरकारने 31 ऑक्टोबर 2022 रोजी रांजणगाव येथे 297.11 एकर जागेवर ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ उभारणीस मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी 492 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 208 कोटी रुपये केंद्राचा हिस्सा असून यातील पहिल्या टप्प्यातील 62 कोटी 39 लाख रुपये केंद्राने एमआयडीसीकडे वर्ग केले आहेत.
रांजणगाव येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात IFB, LG आणि Gogoro EV Scooter यासारख्या कंपन्यांचा सहभाग असेल. या प्रकल्पामुळे हा परिसर ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’ म्हणून नावारूपास येईल, अधिक उद्योजक, कंपन्या तेथे आकर्षित होऊन त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. हे EMC कार्यन्वित करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि एमआयडीसीने विशेष परिश्रम घेतल्याचे सांगून त्यांचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मुक्काम पोस्ट माळेगांव खुर्द!! अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आदिवासी बहुल भागात नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन
– मोठी बातमी! पवनानगर भागातील प्रसिद्ध कृषी व्यवसायिकाच्या घरी 14 लाखांची घरफोडी, परिसरात खळबळ
– बहुचर्चित येळसे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बायडाबाई कालेकर; 50 वर्षांत पहिल्यांदाच शेवती वसाहतला सरपंचपदाचा मान