Dainik Maval News : यवतमाळ जिल्ह्यातील रोजगार हमी योजना पाहणी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या रोजगार हमी योजना समितीने प्रमुख आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली कळंब, राळेगाव आणि मारेगाव तालुक्यातील थाळेगाव, गांधा, उमरी, वाटखेड, एकलारा, सावंगी, रिथोरा, केगाव, गाडेगाव आदी ग्रामपंचायतींना भेट दिली.
या दौऱ्यात सार्वजनिक वृक्षलागवड प्रकल्प, जिल्हा परिषद शाळेची संरक्षणभिंत, मातोश्री पाणंद रस्ता (उमरी ते सावरगाव), प्रभाकर गुजर यांच्या गुरांच्या गोठ्याला भेट, कुसुम वाघ यांच्या शेतावरील विहीर, ‘उमेद’ अंतर्गत मत्स्य उद्योग केंद्र, सीसी नाली बांधकाम, सीसी रोड (जुनी ग्रामपंचायत ते रुद्रेश्वर पिसाळकर यांचे घर) अशा विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थ व लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. स्थानिक अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि संबंधित जबाबदार व्यक्तींशी चर्चा करून प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडथळ्यांचा आढावा घेण्यात आला.
या वेळी आमदार राजेश वानखडे, आमदार किरण सरनाईक, आमदार दराडे यांच्यासह स्थानिक प्रशासन आणि विभागीय अधिकारी उपस्थित होते.
कळंब तालुक्यात रोजगार हमी योजनेत अनियमितता असल्याच्या तक्रारींची दखल घेत आमदार सुनील शेळके यांनी संबंधित बीडीओ आणि ग्रामसेवकांची चौकशी करण्याची घोषणा केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ ; क्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार
– पोरांनो… तयारीला लागा ! महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
– रोजगार हमी योजना समितीचे प्रमुख आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यात प्रकल्प पाहणी ; लाभार्थ्यांशी थेट संवाद