Dainik Maval News : एक वर्ष पूर्ण होत आले तरीही कामशेत ग्रामपंचायतीला पूर्ण वेळ ग्राम विकास अधिकारी प्राप्त झालेला नाही. पर्यायी ग्रामसेवक म्हणून कान्हे गावचे ग्रामविकास अधिकारी संतोष शिंदे हे कार्यभार सांभाळत आहेत. परंतु दोन्ही ग्रामपंचायती तुलनेने मोठ्या असल्यामुळे एकाचवेळी त्यांना कान्हे व कामशेत ग्रामपंचायतीला पुरेसा वेळ देता येत नाहीत.
आठवड्यातील दोनच दिवस संतोष शिंदे हे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित असतात. त्यामुळे नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. आठ अ चा उतारा, रहिवासी दाखला, जन्म दाखला आदी शासकीय दाखले, कागदपत्रे मिळविण्यासाठी नागरिकांनी कित्येक दिवस वाट पाहावी लागत आहे. ग्रामपंचायतीचीही अनेक कामे ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे अर्धवट अवस्थेत आहेत.
पर्यायी अधिकारी असल्यामुळे त्यांना वेळेची व कामाची मर्यादा येते. यामुळे ग्रामविकास अधिकारी नसल्याने ग्रामपंचायतीची विकासकामे रखडली असल्याची नागरिकांची तक्रार आहे. यासंबंधी ग्रामपंचायत कार्यालयातील पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा सीईओ यांना पत्र दिले आहे. दरम्यान, कामशेत ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारीचा प्रश्न सीइओ समोर ठेवला आहे. त्यामुळे ते लवकरच यावर निर्णय घेतील, असे गट विकास अधिकारी विरेंद्र प्रधान यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अनाधिकृत नळजोड धारकाला वीस हजाराचा दंड, उघड्यावर कचरा टाकल्यास एक हजाराचा दंड, नगरपंचायतीचा निर्णय । Dehu News
– कचऱ्यातील नारळापासून कोकोपीट खताची निर्मिती ; तळेगाव नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक उपक्रम । Talegaon Dabhade
– चौकाचौकात वाहतूक कोंडी ! वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह मावळातील स्थानिक नागरिक त्रस्त । Maval News