Dainik Maval News : सह्याद्री विद्यार्थी अकादमी आणि सह्याद्री प्रतिष्ठान मावळ तालुका संघटनेची कार्यकरिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत एकूण १५ जणांचा समावेश आहे.
सह्याद्री अकादमीचे मावळते तालुका अध्यक्ष सहदेव केदारी, जिल्हा प्रमुख किरण ढोरे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख चेतन वाघमारे, सह्याद्री प्रतिष्ठान कार्यकारी अध्यक्ष सचिन शेडगे, अतिश थोरात, निलेश गराडे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
सह्याद्री प्रतिष्ठानच्या नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी बाळासाहेब जमादार, उपाध्यक्षपदी किशोर वाघमारे, सचिवपदी संदीप जाधव, प्रसिद्धीप्रमुखपदी तुषार भोसले यांची निवड करण्यात आली.
सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळच्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी केदार डाखवे, उपाध्यक्षपदी तेजस वाघवले, कार्याध्यक्षपदी सत्यम तिकोने, सचिवपदी अनिष शर्मा, खजिनदारपदी रूपाली कटके, अश्विन दाभाडे, प्रसिद्धीप्रमुखपदी सुभाष भोते, निखिलेश दौंडे व सहसचिवपरदी अंकुश काटकर यांची निवड करण्यात आली.
सह्याद्री विद्यार्थी अकादमी मार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, क्रीडा साहित्य वाटप तसेच इतरही विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. तर सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने दुर्ग संवर्धनाचे कार्य करण्यात येते. सध्या प्रतिष्ठानच्या वतीने तुंग किल्ल्यावर दुर्ग संवर्धनाचे काम चालू आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– येत्या तीन ते चार महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकेच्या निवडणुका होणार !
– बाजार समितीवर कुणाची सत्ता राहणार ? मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची नव्याने निवड होणार
– राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले ! पक्षाची कोअर कमिटी जाहीर , आमदार सुनील शेळके यांचा समावेश । Maval News