मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा गुरुवारी (दि. 16) सन्मान होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, सिने अभिनेते अशोक समर्थ यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा होणार आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्यावतीने, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. याबाबतची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष धनाजी बारणे, उपाध्यक्ष रवी नामदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त मागील चार दिवसांपासून विविध कार्यक्रम होत आहेत. (Exemplary Individuals Organizations Will Be Honoured On Occasion Of Maval Lok Sabha MP Shrirang Barane Birthday)
‘या’ आदर्श व्यक्ती, संस्थांचा होणार सन्मान –
कीर्तनकार डॉ.पंकज महाराज गावडे, जालंधर महाराज काळोखे (वारकरी भूषण), भाऊसाहेब भोईर (समाज भूषण), डॉ.अविनाश वाचासुंदर (आरोग्य भूषण), राकेश सोनिगरा (उद्योगरत्न), वैशाली देशमाने (योग भूषण), अजित जगताप (पर्यावरण भूषण), धनंजय वर्णेकर (शिक्षण रत्न), आरती भेगडे (शिक्षण भूषण), नीता मोहिते (शिक्षण रत्न), शिवदुर्ग मित्र लोणावळा ट्रेकिंग अॅण्ड अॅडव्हेचर क्लब (दुर्ग रत्न), खंडू भोंडवे (कृषी रत्न), खुशी मुल्ला (क्रीडा रत्न), सूर्यकांत ताम्हाणे, रामदास माळी, बसवराज कनजे (समाज भूषण), एस.के.एफ.कामगार युनियन (आदर्श कामगार संघटना), सातारा मित्र मंडळ (समाजसेवा भूषण), गणेशम २ सोसायटी, रामतीर्थ हौसिंग सोसायटी, रिचमंड सोसायटी (आदर्श सोसायटी).
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे येथील कैकाडी समाजाच्या समस्या तातडीने सोडवा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश । Talegaon Dabhade
– राज्यात ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर वाळू विक्रीचे दर निश्चित करणार; शिंदे सरकारचे एकापेक्षा एक मोठे निर्णय, वाचा सविस्तर
– भव्य बैलगाडा शर्यत.. कुस्तीचा जंगी आखाडा आणि मनोरंजनाची मेजवानी! टाकवे गावच्या यात्रेला जल्लोषात सुरुवात