Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडून वडगाव शहराच्या हद्दीतील सर्व मिळकतधारकांना आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने दि. १९/०५/२०२५ रोजी मालमत्ता करावरील शास्ती (दंडात्मक व्याज) माफीसाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार वडगाव नगरपंचायत मार्फत प्रस्ताव स्वीकारणे सुरु असून नागरिकांच्या मागणीनुसार सदरच्या योजनेस दिनांक ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदत वाढ देण्यात येत आहे.
तरी जास्तीत जास्त करदात्यांनी आपल्या मालमत्तेची २०२५-२६ पर्यंतची कर मागणीची रक्कम , शास्तीची (दंडात्मक व्याजाची) रक्कम वगळून उर्वरित कराची रक्कम भरणा करून सदर लोकहित योजनेचा फायदा घ्यावा.
सविस्तर माहितीसाठी सिद्धेश्वर महाजन (कर निरीक्षक) कर विभाग, नगरपंचायत कार्यालय वडगाव यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी ! विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास मनाई ; पुणे शहर पोलीस उपआयुक्तांचा आदेश
– जी.एस.टी. कर कपातीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला मिळणार चालना ; पाहा कर कपातीमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे
– महसूल विभाग १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘सेवा पंधरवडा’ राबविणार