पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) या परीक्षेकरीता शाळा माहिती प्रपत्र आणि ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता 20 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची 15 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र अद्यापपर्यंत शाळांनी ऑनलाईन शाळेची माहिती आणि- आवेदनपत्र भरलेले नसल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. ( Extension Of Time To Fill Application Form For Standard 5th And 8th Scholarship Examination )
शाळा माहिती प्रपत्र आणि ऑनलाईन आवेदनपत्र व नियमित शुल्क ऑनलाईन भरण्याची मुदत 20 डिसेंबर, विलंब शुल्क 21 ते 25 डिसेंबर, अतिविलंब शुल्क भरण्याची मुदत 26 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत आहे. शाळांनी आपली माहिती आणि आवेदनपत्र विहीत मुदतीत भरण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– अनुसूचित जातीच्या उमेदवारांना स्टार्ट-अपसाठी प्रशिक्षण, जाणून घ्या
– गोडुंब्रेमध्ये रानमांजरीच्या पिल्लांना जीवदान; वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी घडवली आई आणि पिल्लांची भेट